गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:- 26 एप्रिल 2025
आष्टी पोलिसांनी फक्त दोन दिवसांत केलेल्या तांत्रिक तपासामुळे एक गंभीर गुन्हा उघडकीस आला असून, अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी राजस्थानातील कोटा येथून ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांच्या दक्षतेचा उत्तम नमुना मानली जात आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी योगेश रामाजी वाटगुरे (वय 45, रा. कोणसरी, ता. चामोर्शी) हे 24 एप्रिल रोजी सकाळी आष्टी येथे कामानिमित्त गेले असता त्यांच्या अल्पवयीन मुलीस वैष्णव गणपती मोटघरे (रा. जूनगाव, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) याने फूस लावून पळवून नेले.
फिर्यादीच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अप.क्र. 97/2025 अन्वये कलम 137(2) भा.न्या.स. 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे व अपर पोलीस अधीक्षक कार्तिक (प्राणहिता विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे, आरोपी व पीडित मुलगी कोटा, राजस्थान येथे असल्याचे निष्पन्न झाले. पो.उ.नि. अभिजीत तुतूरवाड, पो.शि. सतीश गुडा, महिला पो.शि. पायल ताराम, आणि पो.शि. चापोशी राऊत यांनी संयुक्त कारवाई करून दोघांनाही ताब्यात घेतले.
आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे. या गुन्ह्यात अन्य कुणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.#GadchiroliNews #AshtiPolice #CrimeAgainstMinor #ChildSafety #PoliceAction #MissingGirl #CriminalArrested #MaharashtraCrime #QuickPoliceResponse #IndianPoliceForce