गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक- 26/06/2025
गडचिरोली जिल्ह्रात वाढत्या चोरीच्या व घरफोडीच्या गुन्ह्रांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने दि. 26/05/2025 गडचिरोली शहरात मागील आठवड¬ामध्ये चामोर्शी रोड, धानोरा रोड, चंद्रपूर रोडवरील व्यापारी दुकानांची शटर लॉक तोडून चोरी करणारी टोळी उघडकीस आणण्याची कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन गडचिरोली येथे दि. 19/06/2025 रोजी अप क्रमांक 426/2025 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331 (4) अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफच्या अधिकारी व अंमलदार यांनी शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून, रात्रगस्त वाढवून सदर टोळीतील आरोपींचा शोध घेतला असता, उत्कृष्ट तपास करुन गडचिरोली पोलीसांनी 04 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे. सदर अल्पवयीन बालकांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अल्पवयीन आरोपींना पुढील कायदेशीर प्रक्रियेकरिता मा. बाल न्यायमंडळ गडचिरोली यांचे समोर हजर केले जाण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. सदरची कारवाई बाल कल्याण पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन, गडचिरोली यांचे मार्फतीने होणार आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोहवा/दिलीप खोब्रागडे हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, डिटेक्शन पथकातील पोलीस अंमलदार/धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्राागडे, अतुल भैसारे यांनी पार पाडली आहे.