ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
विदर्भ न्युज 24 नेटवर्क
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home आपले गडचिरोली

*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर…

*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित*जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रभावी सादरीकरण* *वर्ल्ड बँक व ‘मित्र’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.आय.एम. नागपूर येथे परिषद*

मुख्य संपादक by मुख्य संपादक
June 29, 2025
in आपले गडचिरोली
0
*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर…
Spread the love

गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक:-29/06/2025                   ‘मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुरल डिस्ट्रीक्ट्स (मित्र) ‘ व जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेत ‘महास्ट्राइड’ उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयआयएम नागपूर येथे केले.

      “नव्या दृष्टीकोनातून गडचिरोली – आकांक्षांपासून कृतीकडे” या संकल्पनेवर आधारित सादरीकरणात त्यांनी जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक रूपांतरणाचा आराखडा मांडला. नागपूर विभागातून महास्ट्राइडसाठी निवड झालेला गडचिरोली हा एकमेव जिल्हा होता.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणात गडचिरोलीच्या विकासाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, सध्या जिल्ह्याचे एकूण उत्पन्न ₹१०,९२१ कोटी असून ते २०२८ पर्यंत ₹२७,३०३ कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, प्रति व्यक्ती उत्पन्न सध्याच्या ₹१,४०,८६० वरून दुप्पट म्हणजेच ₹२,८०,३२० पर्यंत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात गडचिरोली जिल्ह्याचे योगदान सध्या ०.४५ टक्के असून ते ०.७ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्याची ‘स्टील नगरी’कडे वाटचाल, सेंद्रिय शेती, वनउपज व पर्यटन विकास, बँकिंग व सामाजिक सुरक्षा सेवा, जलसंपत्ती व मत्स्य व्यवसाय, जीआयएस आधारित योजना व अंमलबजावणी प्रणाली आदी विषयांवरही त्यांनी विकास आराखड्याची माहिती दिली.

राज्य शासनाच्या ‘मित्र’ (मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुरल डिस्ट्रीक्ट्स) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘महास्ट्राइड’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथील आयआयएम सभागृहात काल झाला. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरण केले.

  या परिषदेत महास्ट्राइड उपक्रमांतर्गत प्रत्येक विभागातून एका जिल्ह्याची निवड सादरीकरणासाठी करण्यात आली होती.गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह, वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. किर्तीकिरण पुजार, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे या सहा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

       मुख्यमंत्री फडणवीस यांनी महास्ट्राइड उपक्रमाला राज्याच्या परिवर्तनाचे माध्यम ठरवून जिल्ह्याचा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर व राणा जगजीतसिंह पाटील, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना व राजगोपाल देवरा, जागतिक बँकेचे प्रतिनिधी मारचीन पियाटकोस्की यांची उपस्थिती होती.

Tags: #cmomaharashtra#Divisional #Committee #Member) व #एकसदस्य #पदावरील #माओवाद्यांनी #केले #आत्मसमर्पण#gadchirolipolice #cmo#मुख्यमंत्री #देवेंद्र #फडणवीस #यांचे #प्रयत्न#अतिदुर्गम #भागातील #नागरिकांच्या #चेहऱ्यावर #फुलले #हास्य*
Previous Post

“गडचिरोलीत बदलते समीकरण: माओवादी गडाला हादरा देणारे ‘नीलोत्पल’!”…

Next Post

गडचिरोली पोलीसांनी समयसुचकता दाखवत वाचविले सती नदीत वाहून जाणा­या व्यक्तीचे प्राण…

मुख्य संपादक

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार मुख्य संपादक – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क संदीप राचर्लावार हे पत्रकारितेतील एक समर्पित, निःपक्ष आणि निर्भीड व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी “विदर्भ न्यूज 24 नेटवर्क” या डिजिटल माध्यमाची स्थापना केली, यामागील उद्दिष्ट एकच – समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या समस्या, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न शासनाच्या दरबारी पोहोचवणे. त्यांचे लिखाण सडेतोड असून सत्य आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारे आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत त्यांनी डिजिटल पत्रकारितेत नाविन्यपूर्ण प्रयोग घडवले आहेत. त्यांनी नवोदित पत्रकारांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी कार्य केलं आहे. विदर्भासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील घटनांचा अचूक आणि वेळेवर आढावा घेणारे त्यांचे वृत्तांकन आज विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे. त्यांचा पत्रकारितेतील विश्वास अगदी स्पष्ट आहे — "बातमी ही केवळ माहिती नव्हे, ती समाजपरिवर्तनाचे साधन असते." त्यांच्या नेतृत्वात "विदर्भ न्यूज 24 नेटवर्क" हे माध्यम प्रामाणिक, जागरूक आणि लोकाभिमुख पत्रकारितेचे एक मजबूत व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. संपर्क: मो. 9421729671 / 9423502555 ईमेल: sandeep.racharlasrc@gmail.com कार्यकारी संपादक * * *संजय भोयर* *082757 50589* Sandeep Racharlawar Editor-in-Chief – Vidarbha News 24 Network Sandeep Racharlawar is a dedicated, impartial and fearless personality in journalism. He founded the digital medium “Vidarbha News 24 Network”, with one goal – to bring the problems of people from all walks of life, especially farmers and the underprivileged in rural areas, to the attention of the government. His writing is straightforward and keeps truth and social interest at the center. He has created innovative experiments in digital journalism by making effective use of technology. He has done guiding and inspiring work for budding journalists. His reporting, which provides accurate and timely reviews of events in Vidarbha, Maharashtra, Telangana and Chhattisgarh, has become a symbol of credibility today. His belief in journalism is very clear — "News is not just information, it is a tool for social transformation." Under his leadership, "Vidarbha News 24 Network" has emerged as a strong platform for honest, conscious and people-oriented journalism. Contact: Md. 9421729671 / 9423502555 Email: sandeep.racharlasrc@gmail.com Executive Editor * * *Sanjay Bhoyar* *082757 50589*

Next Post
गडचिरोली पोलीसांनी समयसुचकता दाखवत वाचविले सती नदीत वाहून जाणा­या व्यक्तीचे प्राण…

गडचिरोली पोलीसांनी समयसुचकता दाखवत वाचविले सती नदीत वाहून जाणा­या व्यक्तीचे प्राण...

Please login to join discussion

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025
हरवलेले व चोरीला गेलेले 72 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

हरवलेले व चोरीला गेलेले 72 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

July 4, 2025
भाजपाच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष निवडीचा ऐतिहासिक सोहळा – नवे नेतृत्व भाजपाला बळकट करणार…

भाजपाच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष निवडीचा ऐतिहासिक सोहळा – नवे नेतृत्व भाजपाला बळकट करणार…

July 1, 2025

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

कार्यकारी संपादक:-संजय भोयर विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Follow Us

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Currently Playing

मुख्य संपादक संदीप राचर्लावार विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Browse by Category

  • Food
  • Gadget
  • Mobile
  • Music
  • News
  • Politics
  • Review
  • Science
  • Sports
  • Startup
  • Tech
  • Travel
  • Uncategorized
  • World
  • अग्रलेख
  • आपला सिरोंचा
  • आपले अहेरी
  • आपले एटापल्ली
  • आपले गडचिरोली
  • आपले चंद्रपूर
  • आपले चामोर्शी
  • आपले नागपूर
  • आपले विदर्भ
  • छत्तीसगड राज्य
  • तेलंगाना राज्य
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
  • विशेष संपादकीय

VN24 Visitor

5 8 7 4 8 4
Users Today : 12
Total Users : 58748410
Views Today : 14
Total views : 58766480
Who's Online : 1
Your IP Address : 216.73.216.179
Server Time : 2025-07-06
Powered By WPS Visitor Counter

Recent News

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025

‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ हे विदर्भासह महाराष्ट्र देश-विदेशातील राजकारण, प्रशासन यावर सत्य, परखड आणि निर्भीड वृत्तांकन तसेच विश्लेषणाचे एकमेव व दर्जेदार व्यासपीठ होय. ‘सत्ता, संघर्ष आणि सत्य’ याचा सखोल मागोवा घेऊन ताज्या, पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि निःपक्ष बातम्यांमधून वाचकांशी विश्वासाचे नाते तयार करणारे डिजीटल न्यूज पोर्टल म्हणून ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ ओळखले जाते. राजकारण, प्रशासन अन् देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे वस्तुनिष्ठ अपडेट्स देणे, हाच ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्कच्या’ उद्देश आहे.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

error: Content is protected !!