गडचिरोली विदर्भ न्यूज-24 नेटवर्क दिनांक:-09/02/2025
लगतच्या छत्तीसगड राज्यामध्ये मध्ये रविवारी (दि.९) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात झालेल्या या चकमकीत १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
छत्तीसगडमध्ये त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या आधी बिजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर सैनिकांनी चकमकीत १२ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. बिजापूर जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील राष्ट्रीय उद्यान परिसरात सकाळपासून ही चकमक सुरू आहे. बस्तर पोलिसांनी चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. सध्या इतर नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बस्तर पोलिसांनी सांगितले की, बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. शोध मोहीम सुरू आहे.
या कारवाईत सुरक्षा दलांनी अनेक स्वयंचलित शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा देखील जप्त केला आहे. या चकमकीत अनेक वरिष्ठ नक्षलवादी कमांडरही सामील असल्याचे मानले जात आहे, ज्यांना घेरण्यात आले आहे.
बिजापूरच्या या भागात पंचायत निवडणुकीपूर्वी सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. सुरक्षा दलांना आधीच संशय होता की नक्षलवादी मोठी घटना घडवण्याचा कट रचत आहेत, म्हणून कारवाई तीव्र करण्यात आली. या चकमकीनंतर पोलिस प्रशासनाने आजूबाजूच्या भागात गस्त वाढवली आहे आणि सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे.