आष्टी – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-12/02/2025
दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी फुलणार – दिरंगीच्या जंगलात झालेल्या पोलिस – नक्षल चकमकीत वीर जवान महेश नागुलवार यांना वीरगती प्राप्त झाली.
12 फेब्रुवारी बुधवारी शहीद पोलिस जवान महेश कवडू नागुलवार यांना मूळ गाव असलेल्या अनखोडा येथे हजारोंच्या उपस्थितीत साश्रूनयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे सह पालकमंत्री ना. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती होती .

आपल्या गावचा वीर सुपुत्र शाहिद झाल्याने पूर्ण अनखोडा गाव शोकसागरात बुडाला. शहीद महेशचे पार्थिव अनखोड्याच्या वेशीवर येताच रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकवटले व शहीद जवान महेश नागुलवार अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा महेश तेरा नाम रहेगा या घोषणांनी वातावरण दुमदुमले. पार्थिव घरी आणताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला . घरापासून स्मशान भूमी पर्यंत हजारो नागरिकांची एकच गर्दी होती. प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पार्थिव स्मशानभूमीवर पोहोचताच बंदुकीच्या फेऱ्यानी गडचिरोली पोलिस पथकाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ना. आशिष जयस्वाल, आमदार डॉ, मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अनखोड्याच्या सरपंच रेखाताई येलमुले, उपसरपंच वसंत चौधरी व नातेवाईकांनी महेश च्या पुष्पचक्र पार्थिवार पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी सहपालक मंत्री ना. आशिष जयस्वाल यांनी महेश च्या आईची व पत्नी व नातेवाईकांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी एकच टाहो फोडला.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीन देशमुख, एम. रमेश, श्रेणिक लोढा, चामोर्शी चे तहसीलदार प्रशांत घोरूडे, सर्वंग विकास अधिकारी सागर पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार युवक काँग्रसचे सरचिटणीस अँड. विश्वजीत कोवासे यांची प्रमूख उपस्थिती होती.