आष्टी – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-16/02/2025
गोंडवाना विद्यापीठात 03 ते 05 फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव 2024-25 मध्ये श्री सद्गुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी चे विद्यार्त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतले होते त्यात बी. एस. सी अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कुमारी खुशबू बोरकुटे हिने नकला या स्पर्धेत प्राविण्य मिळवले. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एम.माटे सर यांनी खुशबू बोरकुटे तसेच इतरविद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. याप्रसंगी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. महेशकुमार सिलमवार, डॉ. सोनाली धवस तसेच इतर प्राध्यापक वृंद डॉ. पी. के. सिंग, डॉ.एम. पी. सिंग, डॉ. प्रदीप कश्यप, डॉ. दिपक नागापुरे, प्रा. सुबोध साखरे, प्रा. सचिन मुरकुटे,प्रा.जया रोकडे, प्रा. कविंद्र साखरे, प्रा. राहुल आवारी, प्रा. पल्लवी शहा, शिक्षकेत्तर कर्मचारी रवींद्र झाडे, संदीप मानापुरे,अविनाश जिवतोडे, सविता गारघाटे, विजय खोब्रागडे, शुभांगी डोंगरे,रमेश वागदरकर, उषाताई माहूरपवार, पौर्णिमा गोहने यावेळी उपस्थित होते.