आष्टी – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-23/02/2025
श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सदगुरु साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे विद्यार्थी विकास योजनेअंतर्गत दि. 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या तीन दिवसीय अनिवासी विशेष व्यक्तिमत्व विकास शिबिराचे शुभारंभ करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेंद्र माटे होते तर या व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय फुलझले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.राजकुमार मुसने महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी,मा.श्रीमती प्रियंका इडपात्रे,जिल्हा कौशल्य विकास कार्यालय गडचिरोली प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रमेशचंद्रजी मुनघाटे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना विद्यापीठ गीताने करण्यात आली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे महत्व व व्यक्तिमत्व विकासात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महेशकुमार सिलमवार यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सेजल तावाडे तर आभार नयन सडान या विद्यार्थ्यांने मानले.या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.महेशकुमार सीलमवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.या कार्यक्रमाला डॉ.पी के सिंग,डॉ.प्रदीप कश्यप, डॉ.सोनाली ढवस,डॉ.दीपक नागापुरे, प्रा.सुबोध साखरे,प्रा.जया रोकडे, प्रा.पल्लवी शहा,सविता गारघाटे,रवींद्र झाडे, संदीप मानापुरे,शुभांगी डोंगरे,अविनाश जीवतोडे,विजय खोब्रागडे,उषा माहूरपवार, रमेश वागदरकर,पोर्णिमा गोहने,शुभम एकरे, सचिन कुमरे,नित्यानंद हलदार,प्रशिक डोंगरे व महाविद्यालयीन विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.