सावली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-26/02/2025
गडचिरोली – चंद्रपूर जिल्हयातील सीमेवरून वाहणाऱ्या व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात तीन बहिणी बुडाल्याची दुदैवी घटना आज दिनांक 26 फेब्रुवारी बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
कु. प्रतिमा प्रकाश मंडल वय 23 वर्ष, कु. कविता प्रकाश मंडल वय 21 वर्ष, कु. लीपिका प्रकाश मंडल वय 18 असे या नदीपात्रात बुडालेल्या तीन बहिणीचे नाव आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील रहिवाशी असलेले मंडल कुटुंबीय महाशिवरात्रीनिमित्त मार्कांडा देव येथे जाण्यासाठी निघाले मात्र वाटेत असलेल्या व्याहाड जवळील वैनगंगा नदीपात्रात ते आंघोळीसाठी उतरले त्यावेळी पाच जण नदीच्या खोलपात्रात बुडाले त्यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले मात्र तीन सख्ख्या बहिणी नदीपात्रात बुडाल्या त्यांचा शोध अद्यापही लागला नाही.
या तिघींनी पाण्यात बुडत असतांना आरडा ओरड केली. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी लोक धावले. मात्र खोल पाण्यात असल्याने त्यांना पाण्याच्या बाहेर काढता आले नाही. त्यांच्याच बाजूला असलेल्या दोघींना वैनगंगा नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र या तिन्ही बहिणी खोल पाण्यात गेल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही असे सांगण्यात येत आहे. या तिघींंचा युध्दपातळीवर शोध सुरू आहे. या तिघींचा शोध घेण्यासाठी या परिसरातील नावाड्यांना पाचारण करण्यात आले आहे तसेच पोलीसांना माहिती दिली आहे.मोटर बोट देखील मागविली असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी अख्ये मंडल कुटूंब वैनगंगा नदीच्या काठावर होते. आपल्या डोळ्यादेखत तिन्ही मुलींना नदीपात्रात बुडताना पाहून मंडल कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला