गडचिरोली विदर्भ न्यूज २४ नेटवर्क दिनांक: 28/02/2025
गडचिरोली शहरानजीक लागून असलेल्या मुरखळा, पुलखल, कणेरी, व मुडझा येथील जमिनीचे विमानतळासाठी भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने वरील गावातील ग्रामस्थांनी या भु संपादनाला तीव्र विरोध दर्शविला आहे. पुलखल ग्रामपंचायती पाठोपाठ आता मूडझा येथील ग्रामस्थांनी या भू संपादनाचा विरोधात दिनांक 28.फेब्रुवारीला शुक्रवारी ठराव पारीत करीत केला यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुडझा गावातील शेतजमीन सुपिक असून या शेतीवर शेतकरी डबल फसल घेत आहेत बहुतांशी शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन या विमानतळ भूसंपादन करिता जात असल्याने शेतकरी खातेदार भूमीहीन होत आहे. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे साधन राहणार नसुन उपासमारीची वेळ येणार आहे तसेच मुडझा ते गडचिरोली ग्रामीण रुग्णालय येथे जाण्यासाठी रस्ता अवघा एक ते दीड किलोमीटर अंतरावर असून सदर रस्ता बंद झाल्यास ग्रामस्थांना वाकडी मार्गे गडचिरोली रुग्णालयात आठ ते दहा किलोमीटर अंतरावरून जंगलातून जावे लागणार आहे. तसेच वन्यप्राणी रात्री अपरात्री नागरिकावर हल्ला करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि मौजा मुडझा येथे दोन मामा तलाव असून सदर विमानतळ विकसित करण्याकरता ग्रामपंचायत मुडझा येथिल तलावाचे क्षेत्र जात आहे त्यामुळे गावामध्ये ग्रामस्थांना पिण्याचे पाणी व जनावरांना पाणी पिण्याचे तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता वरील संभाव्य धोके लक्षात घेता शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून विमानतळ विकसित करण्यासाठी भूसंपादनाची जागा रद्द करून इतर ठिकाणी व्यवस्था करावी. विमानतळासाठी भूसंपादनालाजमिन देण्यास नकार दर्शवत ठराव पारीत केला