गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:02/03/2025
राज्यकर विभाग, कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन व दि जनरत मर्चेट असोसिएन यांच्या संयुक्त विद्यमाने दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रपूर विभाग राज्यकर सहभायुक्त विनोद गवई यांनी करदात्यांनी राज्यकर विभागाच्या अभय योजनेचा लाभघ्यावा, असे आवाहन केले आहे. गवई पानी उपस्थित करदाते व्यापारी, सनदी लेखापाल, लेखापाल, अॅडव्होकेट यांच्याशी जीएसटीबाबत संवाद साधता व उपस्थितांच्या शंकांचे साध्या व सोध्या भाषेत निरसन केले.
राज्यकर अधिकारी भारतभूषण डुमरे यांनी
उपस्थितांना अभय योजनेबाबत मार्गदर्शन केले तसेच सदर योजना किती सुलभ आहे व व्याधान्यांच्या हिताची आहे हे उपस्थितांना पटवून दिले. मंचावर गडचिरोलीचे सहायक राज्यकर आयुक्त भूषण शहाने, कंझ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप सारडा व जनरल मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष रवी वन्नावार उपस्थित होते
या कार्यशाळेला धानोरा, भामरागड, अहेरी, सिरोंचा, एटापट्टी अशा दुर्गम भागातून करदाते तसेच कर सल्लागार उपस्थित होते. करदात्यांना करभरना करण्यास सुत्तभता यावी याकरिता शासनातर्फे जीएसटी अभय योजना-२०२४ राबविण्यात येत आहे. वित्तीय
वर्ष २०१७-१८, २०१८-१९. २०१९-२० करिता प्रलंबित प्रकरणे आहेत पाकरिता ३१ मार्च २०२५ पर्यंत फक्त कराचा भरणा केल्यास त्यावर लागणारा व्याज व दंड माफ करण्यात आता आहे सदर योजना ही अतिशय लाभदायक आहे
कार्यक्रमाचे संचालन राज्यकर अधिकारी निखिल मोरे यांनी केले तर आभाव्यदर्शन सनदी लेखापाल आनंद सारहा यांनी केले. या कार्यक्रमात पाशित भडके, विकास जक्कलवार, रवद मिसाळ, बंडावार, अॅड. अजिंक्य धात्रक, अँड मंगेश भरडकर आनंद स्वामी. अॅड. सुजित मुजुनदार, प्रविण मलंग, दिपक रामनानी आदी कर सल्लागार उपस्थित होते.