संदीप राचर्लावार मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-05/03/2025
नंदनवन परिसरातील आदित्य धनराज यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोणतीही सिनेमाशी संबंधित कौटुंबिक पार्श्वभूमी नसतानाही, अथक प्रयत्नांमधून त्यांनी मुख्य भूमिकेत पदार्पण करण्याचे स्वप्न साकार केले आहे.
“बंजारा” या मराठी चित्रपटात त्यांना मुख्य अभिनेता म्हणून संधी मिळाली असून, हा चित्रपट येत्या १६ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार भरत जाधव, शरद पोंक्षे आणि सुनील बर्वे यांच्यासोबत आदित्य धनराज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
संघर्षमय प्रवासातून यशाकडे वाटचाल
आदित्य धनराज यांनी आपले अभिनयाचे स्वप्न इयत्ता आठवीत असताना पाहिले. मात्र, कोणत्याही मार्गदर्शनाविना आणि सिनेसृष्टीशी कोणताही संबंध नसताना, या क्षेत्रात स्थान मिळवणे सोपे नव्हते. त्यांनी नागपूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले, मात्र अभिनयाची आवड कायम राहिली.
२०१७ मध्ये मुंबई गाठल्यानंतर त्यांनी नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. २०१८ मध्ये लखनऊ येथील प्रतिष्ठित भारतेंदू नाट्य अकादमीमध्ये त्यांची निवड झाली. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राजपाल यादव यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही याच अकादमीतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर आदित्य यांनी अभिनयात सुवर्णपदक मिळवले.
२०२२ मध्ये मुंबईत परतल्यानंतर त्यांनी विविध ऑडिशन्स दिल्या आणि अखेर “बंजारा” या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून संधी मिळवली.
अभिनयासोबतच प्रशिक्षकाची जबाबदारी
सिनेसृष्टीत पदार्पण करतानाच आदित्य धनराज हे अनुपम खेर यांच्या कला अकादमीत प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांची अभिनयाची नाळ केवळ सिनेमापुरती मर्यादित न ठेवता नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यावरही त्यांचा भर आहे.
त्यांचा हा प्रवास संघर्षमय असला तरीही जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. त्यांच्या आगामी चित्रपटासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
आदित्य धनराज यांना “बंजारा” या मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून संधी मिळाली आहे. हा चित्रपट येत्या १६ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार भरत जाधव, शरद पोंक्षे आणि सुनील बर्वे यांच्यासोबत आदित्य धनराज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Oplus_131072
“Banjara” – A New Marathi Film Set for Release on May 16, 2025
The much-anticipated Marathi film Banjara is set to hit theaters on May 16, 2025. Starring Sharad Ponkshe, Bharat Jadhav, Sunil Barve, Sneha Ponkshe, Saksham Kulkarni, and Aditya Dhanraj in key roles, the film revolves around the journey of three friends in Sikkim, exploring themes of friendship and self-discovery.
Notably, Banjara marks the directorial debut of Sneha Ponkshe, while veteran actor Sharad Ponkshe steps into film production for the first time. This father-daughter duo working together adds a special emotional touch to the project.
With breathtaking visuals, a compelling storyline, and strong performances, Banjara promises to be a treat for travel enthusiasts, adventure lovers, and fans of heartfelt friendships. The film is expected to offer audiences a refreshing cinematic experience, celebrating the essence of companionship and exploration.
संदीप राचर्लावार
मुख्य संपादक – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
संदीप राचर्लावार हे पत्रकारितेतील एक समर्पित, निःपक्ष आणि निर्भीड व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी “विदर्भ न्यूज 24 नेटवर्क” या डिजिटल माध्यमाची स्थापना केली, यामागील उद्दिष्ट एकच – समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या समस्या, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न शासनाच्या दरबारी पोहोचवणे. त्यांचे लिखाण सडेतोड असून सत्य आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारे आहे.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत त्यांनी डिजिटल पत्रकारितेत नाविन्यपूर्ण प्रयोग घडवले आहेत. त्यांनी नवोदित पत्रकारांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी कार्य केलं आहे. विदर्भासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील घटनांचा अचूक आणि वेळेवर आढावा घेणारे त्यांचे वृत्तांकन आज विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे.
त्यांचा पत्रकारितेतील विश्वास अगदी स्पष्ट आहे —
"बातमी ही केवळ माहिती नव्हे, ती समाजपरिवर्तनाचे साधन असते."
त्यांच्या नेतृत्वात "विदर्भ न्यूज 24 नेटवर्क" हे माध्यम प्रामाणिक, जागरूक आणि लोकाभिमुख पत्रकारितेचे एक मजबूत व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे.
संपर्क:
मो. 9421729671 / 9423502555
ईमेल: sandeep.racharlasrc@gmail.com
कार्यकारी संपादक * * *संजय भोयर* *082757 50589*
Sandeep Racharlawar
Editor-in-Chief – Vidarbha News 24 Network
Sandeep Racharlawar is a dedicated, impartial and fearless personality in journalism. He founded the digital medium “Vidarbha News 24 Network”, with one goal – to bring the problems of people from all walks of life, especially farmers and the underprivileged in rural areas, to the attention of the government. His writing is straightforward and keeps truth and social interest at the center.
He has created innovative experiments in digital journalism by making effective use of technology. He has done guiding and inspiring work for budding journalists. His reporting, which provides accurate and timely reviews of events in Vidarbha, Maharashtra, Telangana and Chhattisgarh, has become a symbol of credibility today.
His belief in journalism is very clear —
"News is not just information, it is a tool for social transformation."
Under his leadership, "Vidarbha News 24 Network" has emerged as a strong platform for honest, conscious and people-oriented journalism.
Contact:
Md. 9421729671 / 9423502555
Email: sandeep.racharlasrc@gmail.com
Executive Editor * * *Sanjay Bhoyar* *082757 50589*