आष्टी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-30/03/2025
आष्टी – चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील अनखोडा येथील वळणावर लोखंडी पत्रे वाहतूक करणारा ट्रक अनियंत्रित होवून उलटला. यात विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाल्याची घटना दिनांक 30 मार्च 2025 रविवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली.
रमेश शेरकी वय 60 वर्ष रा. आष्टी, धीरज श्यामकुमार वय 27 वर्ष रा. भिलाई,
मनोज महंतो वय 50 वर्ष रा. भिलाई, धनसिंग चौधरी वय 45 वर्ष रा. भिलाई छत्तीसगड अशी जखमींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, भिलाईवरून गडचिरोली – आष्टी मार्गे ट्रक क्रमांक CG 07 CR 4622 हा लोखंडी पत्रे घेवुन जात होता दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास अनखोडा येथील वळणावर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक अनियंत्रित झाला व तो पलटी झाला. याच वेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या स्कुटीवर ट्रक मधील लोखंडी पत्रे पडली यामुळे दुचाकीस्वाराला मार लागला तर ट्रकमधील तिघे जण जखमी झाले. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे पोलिस पथकासह घटना स्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले व पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. भर रस्त्यात ट्रक पलटी झाल्याने बराच वेळ आष्टी चा मोर्शी मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतुक सूरू कऱण्यात आली.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे