गडचिरोली प्रतिनिधी दिनांक:- 06 मे 2025. उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला असून शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली ची विद्यार्थिनी कुमारी नेहा रमेश लोनबले हिने शेकडा 88.83 गुण प्राप्त करून कला शाखेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. खुशाल संजय राऊत यांनी 88 टक्के गुण प्राप्त केले तर विकास नंदकिशोर लोनबले यांनी 82.50% गुण प्राप्त केले दरवर्षीप्रमाणे महाविद्यालयाने आपल्या यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली असून महाविद्यालयात एकूण निकाल 86.91 टक्के लागलेला आहे. कुमारी नेहा लोनबले हिने आपल्या मनोगतात यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.जे मेश्राम प्राध्यापक आई-वडिलांना दिले आहे तसेच सुरुवातीपासून परीक्षेची तयारी व जादा सराव प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे यशाला गवसणी मिळाल्याचे तिने मनोगत व्यक्त केले आहे या यशाबद्दल शिवाजी शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री संस्थेचे सचिव जी.बी बानबले व सर्व सन्माननीय पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एमजे मेश्राम यांनी विद्यार्थी यांच्या मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यानी प्राप्त केलेल्या यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.