कालेश्वरम विशेष प्रतिनिधी दिनांक:-18/05/2025. कालेश्वर येथे सरस्वती पुष्कर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार या सलग सुट्ट्यांमुळे भाविकांचा लोंढा पुष्कराजकडे वळला आहे. यात्रेला एक कोटीहून अधिक भाविक हजर असल्याचा अंदाज व्यक्त होत असून, यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. काल आणि आज अनुक्रमे सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी तीन ते चार तासांपर्यंत वाहनचालक आणि भाविकांना वाहतुकीसाठी थांबावे लागले.
काही भक्तांनी कंटाळून वाहने रस्त्यातच सोडून पायी प्रवास सुरू केला. रस्त्यांवर गर्दी आणि वाहतुकीची कुचकामी व्यवस्था पाहता नागरिकांमध्ये संतापाचाही सूर दिसून आला. प्रशासनाकडून वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी गर्दीवर नियंत्रण मिळवणे कठीण ठरत आहे.
या यात्रेच्या काळात वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. भाविकांनी सहकार्याचे आवाहन करत, स्थानिक प्रशासनाने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा विचार करावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
Massive Crowd at Pushkar Yatra; Traffic Jams Cause Inconvenience to Devotees
The Pushkar Yatra witnessed an overwhelming turnout this weekend, with an estimated over one crore devotees arriving for the pilgrimage. The coincidence of the yatra with the weekend holidays (Saturday and Sunday) led to a surge in crowd numbers. As a result, long traffic jams were reported on the roads leading to Pushkar, with vehicle queues stretching up to 5 kilometers on both Saturday and Sunday.
Devotees were stranded for 3 to 4 hours in traffic. Frustrated by the standstill, many left their vehicles behind and proceeded on foot toward the pilgrimage site. The local administration is making efforts to manage traffic flow, but the sheer volume of pilgrims has posed a major challenge.
Meanwhile, concerns have been raised over emergency services and crowd management. Authorities are urging the public to remain patient and cooperative while requesting alternative routes be opened to ease the congestion.