कालेश्वर तेलंगाना विशेष प्रतिनिधी दिनांक 19 मे 2025 कालेश्वर पुष्कर परिसरात दररोज सायंकाळी ७ वाजता संपन्न होणारी गंगाआरती हे सध्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. नदीच्या किनारी साजरी केली जाणारी ही आरती अत्यंत भव्य आणि मनोहारी स्वरूपात पार पडत असून, यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे.
ही आरती पारंपरिक पद्धतीने, विशेष रोषणाई आणि सजावटीसह साकारण्यात येत आहे. आरतीसाठी खास करून इतर गावांमधून प्रशिक्षित कलाकार बोलावले गेले आहेत. त्यांच्या समवेत झालेली सामूहिक आरती, शंखध्वनी, ढोल-ताशा आणि दीपमाळांच्या प्रकाशात साकारली जाणारी आरती भाविकांना अध्यात्मिक अनुभव देते.
संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला असून, गंगेच्या तटावर दिव्यांची आरास, फुलांनी सजवलेली आरती स्थळे आणि पारंपरिक संगीत यामुळे वातावरण अधिक भक्तिमय बनले आहे. आरतीच्या वेळी ‘गंगे आरती’चे जयघोष ऐकताच सर्वत्र भक्तिरसाने भारलेले दृश्य पाहायला मिळते.
स्थानिक ग्रामस्थ तसेच परगावांतील भाविकही या गंगाआरतीला उपस्थित राहण्यासाठी येत आहेत. ही आरती आता धार्मिक पर्यटनाचा एक भाग ठरत असून, स्थानिक प्रशासनाकडूनही यास योग्य प्रकारे पाठबळ दिले जात आहे.
गंगाआरतीमुळे केवळ अध्यात्मिक समाधान मिळत नाही, तर परिसराच्या पर्यटनवाढीसही चालना मिळत असल्याचे मत भाविकांनी व्यक्त केले आहे. या आरतीमुळे कालेश्वर पुष्कर हे नवे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येत असल्याचे चित्र दिसून येते.
Ganga Aarti at Kaleshwar Pushkar Becomes a Major Devotional Attraction; Grand Evening Ritual Draws Devotees Daily
Kaleshwar – The daily Ganga Aarti held at 7 PM in the scenic surroundings of Kaleshwar Pushkar has emerged as a major spiritual attraction for devotees. Conducted on the banks of the river, this aarti is performed in a grand and mesmerizing manner, drawing large crowds each evening.
The aarti is carried out in a traditional format, enhanced with special lighting and decorative arrangements. Trained artists from nearby villages have been specially invited to perform the rituals. The collective aarti, accompanied by conch blowing, traditional drums (dhol-tasha), and the illumination of oil lamps, offers a deeply spiritual experience to attendees.
The entire area has been beautifully decorated with rows of lamps, floral arrangements, and devotional music playing in the background, creating a highly divine and immersive atmosphere. As chants of “Ganga Aarti” fill the air, the entire setting becomes soaked in devotion and serenity.
Not just local villagers, but devotees from other towns are also flocking to witness this daily ritual. The aarti has now become an integral part of religious tourism, and local authorities are providing full support for its organization.
Devotees say that the Ganga Aarti offers not only spiritual peace but also boosts the religious and cultural tourism potential of the region. As a result, Kaleshwar Pushkar is fast emerging as a new and prominent spiritual tourism destination.