सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-19/05/2025 केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय हे कालेश्वर (ता. महादेवपूर, राज्य – तेलंगणा) येथे सुरू असलेल्या सरस्वती पुष्कर महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात असताना, त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीच्या सिरोंचा शाखेचा पदाधिकारी व कार्यकर्ते नगरम टी-पॉईंट येथे त्यांचे थापा थांबवून भव्य स्वागत व सत्कार करण्यात आले.
यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सिरोंचा येथे भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. त्यावर प्रतिसाद देताना बंडी संजय यांनी सांगितले की, “सध्या वेळेचे बंधन असल्यामुळे थांबता येणार नाही. मात्र, तुमच्या प्रेमामुळे मी एक दिवस खास जेवणासाठी सिरोंचाला नक्की येईन, हे मी वचन देतो,” असे आश्वासक उद्गार त्यांनी काढले.
या स्वागतप्रसंगी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवे झेंडे, घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. बंडी संजय यांचा पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी उपस्थित मान्यवर पुढीलप्रमाणे –भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार,चेंनुर वरून आलेले वेंकटनार्सय्य,भाजपा जिल्हा सचिव संदीप राचर्लावार,व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष रवी चकिनारापूवार व्यापारी आघाडीचे सचिन मंचालवार आणि सागर मंचालवार, श्रीनाथ पडिशालवार, हरीश तोटावार, श्रीनिवास कोलेटी, सुमन कोलेटी जिल्हा कार्यकारणी सदस्य माधव कासर्लावार तसेच श्रीधार आनकरी, सागर कम्बागोनी आणि इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेषतः भाजप जिल्हा सचिव संदीप राचर्लावार यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा केंद्रीय मंत्री बंडी संजय यांना भेट म्हणून दिली, ही बाब उपस्थितांमध्ये विशेष लक्षवेधी ठरली.
या सन्मान सोहळ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, पुढील काळात सिरोंचात अशाच प्रकारचे राजकीय नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभावे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.