गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक 20 मे 2025. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील भटाळी येथील पीक अप वाहन क्रं.एम.एच.40 , AK 6616 आष्टी मार्गे मुलचेरा येथे जात असताना रेंगेवाही पुलाजवळील वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक बसली व पीक अपची ट्रॉली पलटली .त्यामध्ये एक व्यक्ती जागेवरच ठार झाला.तर एका महिलेला चंद्रपूरला रेफर करतांना मृत्यू झाला. आणि 24 जण जखमी झाले. ही घटना दिनांक 20 मे मंगळवारी दुपारी 12.30 वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
ईश्वर जगन्नाथ कुसराम 55. वर्ष, रा. भटाळी, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर व रंजीता सुधाकर तोडासे वय 42 रा. भटाळी अशी मृतांची नावे आहे.
सविस्तर वृत्त असे की भटाळी व देवई येथील 29जण पीक अप वाहन क्रं .एम.एच.40 ए के 6616 या वाहनाने मुलचेरा तालुक्यातील बंदूकपल्ली येथे तेरवीच्या कार्यक्रमाला जात होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या पीक अप वाहनाचे रेंगेवाही पुलाजवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने वाहनाची झाडाला जबर धडक बसली.यात पीक अप ची ट्रॉली पलटली त्यात दबून एक जण जागीच ठार झाला. तर २४ जण जखमी झाले. मुलचेरा व आष्टी येथील रुग्णवाहिकेने जखमींना रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने २४ जणांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर ला नेत असताना वाटेत रंजीता सुधाकर तोडासे हीचा मृत्यू झाला. पीक अप वाहनाच्या ड्रायव्हर ला अटक करण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे करीत आहे.