गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-23/05/2025 महाराष्ट्र–छत्तीसगड सिमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नुकतेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने काही माओवादी एकत्र येऊन दबा धरुन बसले आहेत. अशा गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 12 तुकड¬ा व सिआरपीएफ 113 बटा. डी कंपनीची 01 तुकडी तातडीने काल दिनांक 22/05/2025 रोजी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात माओवादविरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आली होती.
अवघड जंगल परिसर व प्रतिकूल हवामानाचा सामना करत सदर जंगल परिसरात पोहचून आज दिनांक 23/05/2025 रोजी सकाळी 07:00 वा. च्या सुमारास पोलीस पथकातील जवान सदर जंगल परिसरात घेराबंदी करुन शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
सुमारे दोन तास चाललेल्या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 02 पुरुष व 02 महिला असे एकुण 04 माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. सदर मृतक माओवाद्यांची ओळख पटली असून ती खालीलप्रमाणे आहे
मृतक माओवाद्यांचे नाव
1. सन्नु मासा पुंगाटी, वय 35 वर्षे,
रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली
• भामरागड दलम कमांडर
• बक्षिस – 08 लाख रु.
• चकमक – 01
• खून – 01
• इतर – 01
• एकुण गुन्हे – 032. अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे, वय 38 वर्षे,
रा. कवंडे, तह. भामरागड, जि. गडचिरोली
• भामरागड दलम सदस्य
• बक्षिस – 02 लाख रु.
• चकमक – 06
• जाळपोळ – 01
• खून – 05
• इतर – 05
• एकुण गुन्हे – 173. विज्यो ऊर्फ विज्यो होयामी, वय 25 वर्षे,
रा. पोडीया, गंगालूर एरीया (छ.ग.)
• भामरागड दलम सदस्य
• बक्षिस – 02 लाख रु.
• चकमक – 06
• खून – 05
• इतर – 01
• एकुण गुन्हे – 124. करुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे, वय 21 वर्षे,
रा. गोंगवाडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली
• भामरागड दलम सदस्य
• बक्षिस – 02 लाख रु.
• चकमक – 04
• खून – 02
• इतर – 03
• एकुण गुन्हे – 09
वरील मृतक माओवाद्यांवर चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यासोबतच सदर घटनास्थळावरुन एक एस.एल.आर., दोन .303 रायफल व एक भरमार असे एकूण 04 अग्निशस्त्र, वॉकीटॉकी, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
सदरचे माओवादविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांडंट 113 बटा. सिआरपीएफ श्री. जसवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सिआरपीएफ 113 बटा. डी कंपनीच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले. सन 2021 पासून गेल्या चार वर्षात गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 87 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान, 124 माओवाद्यांना अटक करण्यात आले आहे व 63 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
सदर खडतर अभियानादरम्यान सी-60 व सिआरपीएफच्या जवानांनी दाखविलेल्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी कौतुक केले आहे. तसेच पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पून्हा एकदा सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे