ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
विदर्भ न्युज 24 नेटवर्क
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home आपले गडचिरोली

12 जहाल वरिष्ठ माओवाद्यांनी केले मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण….

मुख्य संपादक by मुख्य संपादक
June 6, 2025
in आपले गडचिरोली
0
12 जहाल वरिष्ठ माओवाद्यांनी केले मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण….
Spread the love

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक- 06/06/2025

 

* डिव्हीसीएम सपनाक्का (डिकेएसझेडसीएम गीरेड्डी पवनानंद रेड्डी याची पत्नी) सह एकूण चार डीव्हीसीएम दर्जाचे वरीष्ठ कॅडर, एक कमांडर, दोन उप-कमांडर, चार एसीएम व एक सदस्य पदावरील माओवाद्यांनी केले मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण
* महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 01 कोटी 12 लाखाचे बक्षिस
* प्रथमच दोन जहाल माओवाद्यांनी स्वयंचलीत एके-47 शस्त्र व इतर शस्त्रांसह माओवादी गणवेशात मा. मुख्यमंत्री यांच्या समक्ष केले आत्मसमर्पण
* मा. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, गिरीधर आणि ललीता यांच्यासह एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्य झाले विवाहबद्ध
* माओवाद विरोधी कारवाईला बळकटी देण्यासाठी डिपीडीसी निधीतून मिळालेल्या 19 चारचाकी वाहनांचा मा. मुख्यमंत्री यांचा हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
* अतिसंवेदनशिल नवनिर्मित पोस्टे कवंडे येथे मान्यवर व 1000 ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला जनजागरण मेळावा
* माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) व सी-60 जवानांचा सत्कार
…………………………………………………………………………………महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री गडचिरोली जिल्हा (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, कायदा आणि न्याय, कामगार) अॅड. श्री. आशिष जयस्वाल यांचा गडचिरोली जिल्हा दौरा आज दिनांक 06/06/2025 रोजी पार पडला. शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 704 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 06/06/2025 रोजी बारा वरिष्ठ जहाल माओवादी नामे 1) सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी (डिव्हीसीएम, इंद्रावती एरीया) वय 55 वर्षे, रा. वेलगूर तह. अहेरी, जि. गडचिरोली, 2) रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी, (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)), वय 55 वर्ष, रा. कवडीकसा, तह. धानोरा, जि. गडचिरोली, 3) शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा(डिव्हीसीएम, कुतुल दलम (कृषी विभाग)), वय 60 वर्ष, रा. गुर्रेकसा, तह. धानोरा, जि. गडचिरोली, 4) पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी (डिव्हीसीएम, कुतुल एरीया कमिटी (कृषी विभाग)) वय 55 वर्षे, रा. गुर्रेकसा तह. धानोरा, जि. गडचिरोली, 5) कोसा कुम्मा गोटा (कमांडर, कुतुल दलम), वय 35 वर्षे, रा. कस्तुरमेट्टा, तह. ओरच्छा, जि. नारायणपूर (छ.ग.), 6) दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी, (उप-कमांडर, अहेरी दलम) वय 35 वर्षे, रा. होडरी, तह. भामरागड, जि. गडचिरोली, 7) अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी (उप-कमांडर, राही दलम) वय 27 वर्षे, रा. भुसापूर, पोस्ट उसुर, तह. मारुबाक, जि. बीजापूर (छ.ग.), 8) संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम (एसीएम, सप्लाय टिम), वय 40 वर्ष, रा. रामय्यापेठा, ता. अहेरी, जि. गडचिरोली 9) सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे (एसीएम, भामरागड दलम), वय 35 वर्ष, रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली, 10) अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे (एसीएम, पश्चिम सब झोनल टेलर टिम) वय 25 वर्षे, रा. झुरी, तह. एटापल्ली, जि. गडचिरोली 11) अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी (एसीएम, डॉक्टर टिम) वय 30 वर्षे, रा. जिंजगाव, तह. भामरागड, जि. गडचिरोली व 12) दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा (सदस्य, कंपनी क्र. 10) वय 28 वर्षे, रा. मुरंगल, तह. भामरागड, जि. गडचिरोली यांनी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. विशेष म्हणजे याच वर्षी दिनांक 01/01/2025 रोजी दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटीची सदस्य ताराक्का सिडाम हिच्यासह एकूण 11 जहाल माओवाद्यांनी मा. मुख्यमंत्री तथा गृह मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विगातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता.

मा. मुख्यमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भेटीदरम्यान गडचिरोली पोलीस दलामार्फत दिनांक 09 मार्च 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोस्टे कवंडे येथे भेट देऊन पोस्टे कवंडे येथील जवानांच्या अभियानाच्या तयारीची पाहणी केली. तसेच पोस्टे कवंडे येथील गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ, एसआरपीएफ व सी-60 च्या जवानांसोबत संवाद साधला व अशा प्रतिकुल अतिसंवेदनशिल ठिकाणी पोलीस स्टेशन स्थापना व त्याच्या संरक्षणाबद्दल केलेल्या प्रयत्नांसाठी जवानांची प्रशंसा केली. याच वेळी मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या जनजागरण मेळाव्यात उपस्थित नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड¬ा व चप्पल, तसेच शालेय विद्याथ्र्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात अतिदुर्गम पोस्टे कवंडे हद्दीतील 1000 हून अधिक नागरीक उपस्थित होते. मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी गावक­यांसोबत संवाद साधताना सांगितले की, रस्ते, पूल आणि मोबाईल टॉवर्सच्या बांधकामांसह या भागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
यावेळी आयोजित गडचिरोली येथील कार्यक्रमादरम्यान गडचिरोली पोलीस दलास जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने माओवाद विरोधी अभियानाकरीता प्राप्त 19 चारचाकी वाहनांचे मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म. रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, गिरीधर आणि ललीता यांच्यासह एकूण 13 आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्यांचा विवाह सोहळा, पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडू आलाम सभागृह येथे मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थितीत पार पडला. यावेळी पोलीसच आत्मसमर्पित माओवाद्यांचे व­हाडी झाल्याचे पहायला मिळाले. मान्यवरांच्या हस्ते सर्व दाम्पत्यांना पुढील आयुष्यासाठी संसार उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. लॉएड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमीटेड यांच्याकडून सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगदान देण्यात आले.
त्यानंतर पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे आयोजित कार्यक्रमात मौजा कवंडे जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये 01 दलम कमांडरसह एकूण 04 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त करुन माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणा­या तसेच दिनांक 20/05/2025 रोजी अबुझमाडच्या बिनागंुडा परिसरातून 01 डिव्हीसीएमसह एकूण 05 जहाल माओवाद्यांना मोठ¬ा शिताफिने अटक करण्यात आली होती. या दोन्ही अभियानात सहभागी विशेष अभियान पथकातील अधिकारी व जवानांचा मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच मौजा कवंडे चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिनांक 11/02/2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा दिरंगी-फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीत शहीद झालेले पोशि/महेश कवडू नागुलवार यांच्या कुटंुबियांस एक कोटी दहा लाख रुपयाचा धनादेश आज मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म.रा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मा. मुख्यमंत्री यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उर्वरीत माओवाद्यांना हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जीवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन केले.
या विविध कार्यक्रमांसाठी मा. अॅड. श्री. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, मा. श्री. राजे धर्मरावबाबा आत्राम, आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र, मा. श्री. डॉ. मिलिंद नरोटे, आमदार गडचिरोली विधानसभा मतदार संघ, मा. श्री. मिलींद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वने) तथा पालक सचिव, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, उपमहानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ, श्री. अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी गडचिरोली, श्री. नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक (अभियान), श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालय, गडचिरोली तसेच सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

आत्मसमर्पीत जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती

1) सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का
बुचय्या चौधरी
* दलममधील कार्यकाळ

1) सन 1991 मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे मे 1991 पर्यंत काम केले.
2) माहे मे 1991 मध्ये टिपागड दलममध्ये बदली होऊन सन 2001 पर्यंत काम केले.
3) सन 2001 मध्ये इंद्रावती दलममध्ये बदली होऊन त्याचवेळी एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2002 पर्यंत काम केले.
4) सन 2002 मध्ये कमांडर पदावर पदोन्नती होऊन इंद्रावती दलममध्ये सन 2009 पर्यंत काम केले.
5) सन 2009 मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन जाटलूर इंद्रावती ओरच्छा दलम इंचार्ज म्हणून आजपावेतो काम केले.
* कार्यकाळात केलेले गुन्हे
सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी हिच्यावर आजपर्यंत एकुण 17 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 02 जाळपोळ व 09 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

2) रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी
* दलममधील कार्यकाळ

1) सन ऑक्टोंबर 1992 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2000 पर्यंत काम केले.
2) सन 2000 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये सन 2002 पर्यंत काम केले.
3) सन 2002 मध्ये कुरखेडा दलममध्ये बदली होऊन कुरखेडा दलम कमांडर पदी पदोन्नती होऊन सन 2012 पर्यंत काम केले.
4) सन 2012 मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन कुरखेडा दलममध्ये सन 2016 पर्यंत काम केले.
5) सन 2016 मध्ये माड डिव्हीजन मधील कुतूल एरिया जंगल परिसरामध्ये कृषी विभागात बदली होऊन आजपावेतो कुतुल एरीया कमिटीत कृषी विभागात डिव्हीसीएम पदावर काम केले.
* कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

3) शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा

* दलममधील कार्यकाळ

1) सन 1991 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 1995 पर्यंत काम केले
2) सन 1995 पर्यंत भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2009 पर्यंत काम केले.
3) सन 2009 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन काम केले.
4) माहे 2010 मध्ये कुतूल एरीया कृषी विभागात बदली होऊन कुतूल एरीया डिव्हीसीएम पदी पदोन्नती होऊन आजपावेतो काम केले.

* कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

4) पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी
* दलममधील कार्यकाळ

1) सन 2000 मध्ये गुर्रेकसा गावातील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये सदस्य पदावर सन 2001 पर्यंत काम केले.
2) सन 2001 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे सप्टेंबर 2003 पर्यंत काम केले.
3) माहे सप्टेंबर 2003 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2008 पर्यंत काम केले.
4) सन 2008 मध्ये भामरागड दलममध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे सप्टेंबर 2009 पर्यंत केले.
5) माहे सप्टेंबर 2009 मध्ये माड डिव्हीजन कुतुल एरीया कृषी कमिटीमध्ये एसीएम पदावर राहून माहे डिसेंबर 2024 पर्यंत काम केले.
6) माहे डिसेंबर 2024 मध्ये कुतूल एरीयातील कृषी विभागात डिव्हीसीएम पदावर बढती होऊन आजपावेतो काम करत होती.

* कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

5) कोसा कुम्मा गोटा
* दलममधील कार्यकाळ

1) सन 2006 मध्ये गाव मिलिशिया मध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2011 पर्यंत काम केले.
2) सन 2011 मध्ये कुतूल दलम (माड डिव्हीजन) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे ऑगस्ट 2011 पर्यंत काम केले.
3) माहे ऑगस्ट 2011 मध्ये परालकोट दलममध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत काम केले.
4) सन 2018 मध्ये कुतूल दलममध्ये बदली होऊन सन 2021 पर्यंत काम केले.
5) सन 2021 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2022 पर्यंत काम केले.
6) सन 2022 मध्ये कुतूल दमल कमांडर पदी बढती होऊन आजपावेतो काम केले.
* कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

6) दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी
* दलममधील कार्यकाळ

1) माहे मार्च 2009 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जून 2009 पर्यंत काम केले.
2) माहे जून 2009 मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन सन 2011 पर्यंत काम केले.
3) सन 2011 मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर सन 2012 पर्यंत काम केले.
4) सन 2012 मध्ये अहेरी दलममध्ये बदली होऊन एसीएम पदावर बढती होऊन आजपावेतो काम केले.

* कार्यकाळात केलेले गुन्हे

दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी हिच्यावर आजपर्यंत एकुण 12 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 01 जाळपोळ व 05 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

7) अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी

* दलममधील कार्यकाळ
1) सन 2014 मध्ये पंचायत सिएनएममध्ये भरती होऊन सन 2015 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
2) सन 2015 मध्ये ऊसुर दलममध्ये सदस्य भरती होऊन माहे डिसेंबर 2015 पर्यंत काम केले.
3) माहे डिसेंबर 2015 माड डिव्हीजन येथील राही दलममध्ये बदली होऊन सन 2017 पर्यंत काम केले
4) सन 2017 मध्ये सीसीएम सोनू ऊर्फ भूपती याचा अंगरक्षक म्हणून सन 2018 पर्यंत काम केले.
5) सन 2018 मध्ये राही दलममध्ये सदस्य पदावर राहून माहे जून 2023 पर्यंत काम केले.
6) माहे जून 2023 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन माहे जूलै 2024 पर्यंत काम केले.
7) माहे जूलै 2024 मध्ये राही दलम उप-कमांडर पदी बढती होऊन आजपावेतो काम केले.

* कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

8) संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम
* दलममधील कार्यकाळ
1) माहे जून 1996 मध्ये चामोर्शी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2002 पर्यंत काम केले.
2) सन 2002 टिपागड दलममध्ये बदली होऊन सन 2004 पर्यंत काम केले.
3) सन 2004 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सप्टेंबर 2012 पर्यंत काम केले.
4) माहे सप्टेंबर 2012 मध्ये चामोर्शी दलममध्ये बदली होऊन माहे डिसेंबर 2012 पर्यंत काम केले.
5) माहे डिसेंबर 2012 मध्ये चातगाव दलममध्ये बदली होऊन सन 2016 पर्यंत एसीएम पदावर काम केले.
6) सन 2016 पासून कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर राहून सन 2021 पर्यंत काम केले.
7) सन 2021 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सप्लाय टिम (पश्चिम ब्युरो) मध्ये बदली होऊन आजपावेतो काम केले.

* कार्यकाळात केलेले गुन्हे
संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम हिच्यावर आजपर्यंत एकुण 58 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 25 चकमक, 09 जाळपोळ व 24 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

9) सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे

* दलममधील कार्यकाळ
1) माहे जून 2006 मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2008 पर्यंत काम केले.
2) सन 2008 मध्ये प्लाटुन क्र. 14 मध्ये बदली होऊन सन 2011 पर्यंत काम केले.
3) सन 2011 मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2017 पर्यंत काम केले.
4) सन 2017 मध्ये प्लाटुन क्र. 07 मध्ये बदली होऊन सन 2018 पर्यंत काम केले.
5) सन 2018 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन पेरमिली दलममध्ये बदली होऊन सन 2022 पर्यंत काम केले.
6) सन 2022 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन आजपावेतो एसीएम पदावर काम केले.

* कार्यकाळात केलेले गुन्हे
सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे हिच्यावर आजपर्यंत एकुण 21 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 11 चकमक, 03 जाळपोळ व 07 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

10) अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे
* दलममधील कार्यकाळ

1) सन 2009 मध्ये कसनसुर दलममध्ये भरती होवून डिव्हीसीएम सृजनक्का हिची अंगरक्षक म्हणून सन 2012 पर्यंत काम केले.
2) सन 2012 मध्ये चातगाव दलममध्ये बदली होऊन सन 2015 पर्यंत काम केले.
3) सन 2015 मध्ये चामोर्शी दलममध्ये बदली होऊन सन 2020 पर्यंत काम केले.
4) सन 2020 मध्ये चामोर्शी दलम रद्द केल्याने कसनसूर दलममध्ये बदली होऊन सन 2021 पर्यंत काम केले.
5) सन 2021 मध्ये ए.सी.एम (एरीया कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन पश्चिम ब्युरो टेलर टिममध्ये बदली होऊन आजपावेतो काम केले.

* कार्यकाळात केलेले गुन्हे
अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे हिच्यावर आजपर्यंत एकुण 39 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 20 चकमक, 02 जाळपोळ व 17 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

11) अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी

* दलममधील कार्यकाळ
1) माहे जुलै 2006 मध्ये पेरीमिली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे ऑक्टोंबर 2006 पर्यंत काम केले.
2) माहे ऑक्टोंबर 2006 मध्ये गट्टा दलममध्ये बदली होऊन सन 2009 पर्यंत काम केले.
3) सन 2009 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2011 पर्यंत काम केले.
4) सन 2011 मध्ये उत्तर बस्तर डॉक्टर ट्रेनिंग प्रतापूर दलममध्ये बदली होऊन सन 2014 पर्यंत काम केले.
5) सन 2014 मध्ये माड डिव्हीजन कुतूल एरीयामधील टेलर टिममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत काम केले.
6) सन 2019 मध्ये टेलर टिममध्ये उप-कमांडर पदावर पदोन्नती होऊन 2023 पर्यंत काम केले.
7) सन 2023 मध्ये इंद्रावती दलममध्ये बदली होऊन इंद्रावती एरीयात डॉक्टर टिममध्ये एसीएम पदावर राहून आजपावेतो काम केले.

* कार्यकाळात केलेले गुन्हे

हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

12) दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा

* दलममधील कार्यकाळ
1) माहे नोव्हेंबर 2013 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जानेवारी 2014 पर्यंत काम केले.
2) माहे जानेवारी 2014 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन डिव्हीसी (सिवायपीसी) मनकु पदाच्या गार्ड मध्ये माहे ऑगस्ट 2014 पर्यंत काम केले.
3) माहे ऑगस्ट 2014 ते आजपावेतो कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर काम करीत होता.

* कार्यकाळात केलेले गुन्हे

दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा याच्यावर आजपर्यंत एकुण 13 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 01 जाळपोळ व 06 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

* शासनाने जाहिर केलेले बक्षीस

* महाराष्ट्र शासनाने सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी हिच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदायाच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी हिच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने कोसा कुम्मा गोटा याच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी याच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
* महाराष्ट्र शासनाने दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा याच्यावर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

* आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन सपना ऊर्फ सपनाक्का ऊर्फ स्वप्ना ऊर्फ पापक्का बुचय्या चौधरी हिला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामदास ऊर्फ झिटकुराम ऊर्फ चिन्नाजी ऊर्फ सोमाजी ऊर्फ रामजी मटकुवरसिंग हलामी याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी हिला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन कोसा कुम्मा गोटा याला एकुण 5.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन दुर्गी ऊर्फ रम्मी चिन्ना विडपी हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अजय ऊर्फ भीमा सोमडू मुचाकी याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन संगिता ऊर्फ मसरी दोगे आत्राम हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन सविता ऊर्फ सुनिता भिमा नरोटे हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अंजु ऊर्फ छाया दसरु वड्डे हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अरुणा ऊर्फ सोमारी ऊर्फ प्रिती येर्रा तलांडी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन दिलीप ऊर्फ सुधाकर कारु मोहंदा याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
(शिवलाल ऊर्फ सुकलु सनकु पदा व त्याची पत्नी पुष्पा ऊर्फ शामबत्ती नांगसाय होळी)
* आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण 10 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 55 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन 2025 मध्ये आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या 12 माओवाद्यांसहित) एकुण 34 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Tags: #मुख्यमंत्री #देवेंद्र #फडणवीस #यांचे #प्रयत्न#अतिदुर्गम #भागातील #नागरिकांच्या #चेहऱ्यावर #फुलले #हास्य*
Previous Post

*‘विकासाच्या अजेंड्यात गडचिरोली अग्रक्रमावर’ -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Next Post

‘नव्या गडचिरोली’चं दर्शन – सामान्य नागरिकांच्या नजरेतून! कवंडे पोस्टवर जनजागृती रॅलीतून ‘पोलिस दडळोरा विंडो’ मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून आला

मुख्य संपादक

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार मुख्य संपादक – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क संदीप राचर्लावार हे पत्रकारितेतील एक समर्पित, निःपक्ष आणि निर्भीड व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी “विदर्भ न्यूज 24 नेटवर्क” या डिजिटल माध्यमाची स्थापना केली, यामागील उद्दिष्ट एकच – समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या समस्या, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न शासनाच्या दरबारी पोहोचवणे. त्यांचे लिखाण सडेतोड असून सत्य आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारे आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत त्यांनी डिजिटल पत्रकारितेत नाविन्यपूर्ण प्रयोग घडवले आहेत. त्यांनी नवोदित पत्रकारांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी कार्य केलं आहे. विदर्भासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील घटनांचा अचूक आणि वेळेवर आढावा घेणारे त्यांचे वृत्तांकन आज विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे. त्यांचा पत्रकारितेतील विश्वास अगदी स्पष्ट आहे — "बातमी ही केवळ माहिती नव्हे, ती समाजपरिवर्तनाचे साधन असते." त्यांच्या नेतृत्वात "विदर्भ न्यूज 24 नेटवर्क" हे माध्यम प्रामाणिक, जागरूक आणि लोकाभिमुख पत्रकारितेचे एक मजबूत व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. संपर्क: मो. 9421729671 / 9423502555 ईमेल: sandeep.racharlasrc@gmail.com कार्यकारी संपादक * * *संजय भोयर* *082757 50589* Sandeep Racharlawar Editor-in-Chief – Vidarbha News 24 Network Sandeep Racharlawar is a dedicated, impartial and fearless personality in journalism. He founded the digital medium “Vidarbha News 24 Network”, with one goal – to bring the problems of people from all walks of life, especially farmers and the underprivileged in rural areas, to the attention of the government. His writing is straightforward and keeps truth and social interest at the center. He has created innovative experiments in digital journalism by making effective use of technology. He has done guiding and inspiring work for budding journalists. His reporting, which provides accurate and timely reviews of events in Vidarbha, Maharashtra, Telangana and Chhattisgarh, has become a symbol of credibility today. His belief in journalism is very clear — "News is not just information, it is a tool for social transformation." Under his leadership, "Vidarbha News 24 Network" has emerged as a strong platform for honest, conscious and people-oriented journalism. Contact: Md. 9421729671 / 9423502555 Email: sandeep.racharlasrc@gmail.com Executive Editor * * *Sanjay Bhoyar* *082757 50589*

Next Post
‘नव्या गडचिरोली’चं दर्शन – सामान्य नागरिकांच्या नजरेतून! कवंडे पोस्टवर जनजागृती रॅलीतून ‘पोलिस दडळोरा विंडो’ मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून आला

‘नव्या गडचिरोली’चं दर्शन – सामान्य नागरिकांच्या नजरेतून! कवंडे पोस्टवर जनजागृती रॅलीतून ‘पोलिस दडळोरा विंडो’ मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून आला

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025

Recent News

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025
विदर्भ न्युज 24 नेटवर्क

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

कार्यकारी संपादक:-संजय भोयर विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Follow Us

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Currently Playing

मुख्य संपादक संदीप राचर्लावार विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Browse by Category

  • Food
  • Gadget
  • Mobile
  • Music
  • News
  • Politics
  • Review
  • Science
  • Sports
  • Startup
  • Tech
  • Travel
  • Uncategorized
  • World
  • अग्रलेख
  • आपला सिरोंचा
  • आपले अहेरी
  • आपले एटापल्ली
  • आपले गडचिरोली
  • आपले चंद्रपूर
  • आपले चामोर्शी
  • आपले नागपूर
  • आपले विदर्भ
  • छत्तीसगड राज्य
  • तेलंगाना राज्य
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
  • विशेष संपादकीय

VN24 Visitor

5 8 7 4 8 8
Users Today : 475
Total Users : 58748873
Views Today : 549
Total views : 58767015
Who's Online : 0
Your IP Address : 216.73.216.179
Server Time : 2025-07-06
Powered By WPS Visitor Counter

Recent News

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025

‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ हे विदर्भासह महाराष्ट्र देश-विदेशातील राजकारण, प्रशासन यावर सत्य, परखड आणि निर्भीड वृत्तांकन तसेच विश्लेषणाचे एकमेव व दर्जेदार व्यासपीठ होय. ‘सत्ता, संघर्ष आणि सत्य’ याचा सखोल मागोवा घेऊन ताज्या, पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि निःपक्ष बातम्यांमधून वाचकांशी विश्वासाचे नाते तयार करणारे डिजीटल न्यूज पोर्टल म्हणून ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ ओळखले जाते. राजकारण, प्रशासन अन् देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे वस्तुनिष्ठ अपडेट्स देणे, हाच ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्कच्या’ उद्देश आहे.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

error: Content is protected !!