चामोर्शी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-03/02/2025
तालुक्यातील आष्टी शहरासह परिसरातील मार्कंडा कंन्सोबा,ईल्लूर,कुनघाडा,ठाकरी,रामनगट्टा,अनखोडा,चंदनखेडी खर्डी इत्यादी गावे चपराळा व वन्यजीव अभयारण्य जंगलाला लागून असल्याने या वन्यजीव अभयारण्यातील जंगलात जाण्यास बंदी आहे. गॅसचे दर परवडत नसल्याने आंघोळीसाठी पाणी गरम करणे, स्वयंपाक इत्यादी दैनंदिन जीवनात वापर करावा लागतो त्याकरिता दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या सर्व गॅसवर करणे गरीबांना परवडत नसल्याने आष्टी परिसरातील अभयारण्य जंगलाला लागून असलेल्या गावांना वनविभागाने जळाऊ राशन कार्डावर बिट उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर फरकडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. हिंदू धर्म रिवाजनुसार मयत ही जाळण्यात येते तसेच आष्टी शहर हे जंगलशेजारीच आहे कोणी मयत झाल्यास त्या कुटूंबियांना धावफळ करावी लागत असून मयत साठी इकडून तिकडून लाकडे आणावी लागत असून आर्थिक भुर्दंड गोरगरीब सामान्य जनतेला पडत आहे. व आष्टी शहराजवळील मार्कंडा (कंन्सोबा) येथे वनविभाग (प्रादेशिक) कार्यालय, वनविकास महामंडळ कार्यालय, चपराळा वन्यजीव अभयारण्याचे वनपाल कार्यालय असे तीन वनविभागाचे कार्यालय आहेत. परंतू एकाही ठिकाणी जळाऊ लाकूड उपलब्ध नाही करीता गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या समस्यांसंदर्भात लक्ष देऊन आष्टी परिसरातील अभयारण्य जंगलाला लागून असलेल्या गावांना जळाऊ बिट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करुन जळाऊ बिट उपलब्ध करून देण्यात यावे अशीही मागणी भास्कर फरकडे यांनी केली आहे.