सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-02/02/2025
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरित्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये काल दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रौ कारसपल्ली गावात दारू येणार असल्याचे गोपनीय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिरोंचा चे पोलीस निरीक्षक चव्हाण यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनचे पथकाने रेड केली. सदर रेडमध्ये सिरोंचा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारसपल्ली गावात MG कंपनीची हेक्टर मोडेलचे चारचाकी क्र. MH 34 BV 0206 या वाहनात 30 देशी दारूचे बॉक्स किंमत 2,40,000/- रुपये विक्री करिता वाहतूक करताना मिळून आले. सदर वाहनाची अधिक तपास केली असता प्रत्यक्ष हजर असलेले आरोपी 1) वैभव ओमप्रकाश राठोड, वय 28 वर्ष, रा. ह. मु. बल्लारशाह जि. चंद्रपूर, 2) वैशाली मिलिंद हुमने, वय 39 वर्ष, यांना अटक केलेले असून त्यांचेकडील वाहन व दारू असा एकूण 17,40,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात अधिक तपास सिरोंचा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मारोती नंदे हे करीत आहेत.
तालुक्यात असा प्रकार अनेक दिवसांपासून चालू असून या प्रकरणानंतर अवैद्य दारू विक्रेते आधारले असून या प्रकरणात अधिक चौकशी केल्यास मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे