गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-11/02/2025
भामरागड तालुक्यात पोलिस नक्षल चकमक उडाली असुन यात एक पोलिस जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे.
भामरागड तालुक्यातील जंगल परिसरातील दिरंगी आणि फुलनार या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी तळ उभारल्याच्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे, काल दिनांक 10/02/2025 रोजी अपर पोलिस अधीक्षक प्रशासन आणि अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या नेतृत्वाखाली १८ सी६० चे पथक आणि सीआरपीएफच्या क्यूएटी चे 2 पथक रवाना करण्यात आले होते.
सदर ठिकाणी आज सकाळी पोलिसांकडून घेराबंदी करण्यात आली असता दिवसभरात माओवादी आणि पोलीस पथकांमध्ये गोळीबार सुरू होता. पोलिसांच्या संयुक्त पथकाने माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून नक्षल साहित्य आणि विविध वस्तू जप्त केल्या आहेत.
सदर कारवाईदरम्यान सी६० पथकाच्या एका जवानाला गोळी लागून दुखापत झाली असून सदर जवानास तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरने गडचिरोली/नागपूर येथे हलवण्यात आले आहे. सदर परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे
Based on a credible Int that a Naxal camp has been set up since last few days between villages Dirangi and Fulnar villages, an Ops of 18 C60 units and 2 QAT units of CRPF led by Addnl SP Admin and Addnl SP Aheri was launched yesterday.
Today morning a cordon was laid, there has been an exchange of fire with Naxals throughout the day. Naxal camp has been busted by joint team and several literature and belongings have been seized by team.
One Jawan of C60 has received bullet injuries and is being evacuated by helicopter to Gadchiroli/ Nagpur for medical treatment. Further search of area is on. Further details will be updated.