गडचिरोली: विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-14/02/2025
NPCI आणि LLF च्या साहाय्याने गडचिरोली जिल्ह्यातील 125 शाळांमध्ये School Transformation Project राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळांना विविध भौतिक सुविधा पुरविण्यात आल्या असून त्यामध्ये विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्मार्ट बोर्ड, R.O. वॉटर प्युरीफायर, बालाशास्त्रानुसार पेंटिंग (BaLA Painting), शौचालयांचे दुरुस्तीकरण आणि खेळण्याचे साहित्य यांचा समावेश आहे.
शाळांमध्ये केवळ सुविधा देण्यापुरते मर्यादित न राहता शिक्षक प्रशिक्षण (Teacher Training), महिला सक्षमीकरण सत्र आणि शाळा व्यवस्थापन समिती (SMC) प्रशिक्षण असे विविध उपक्रमही राबविले जात आहेत. विज्ञान प्रयोगशाळेत उपलब्ध करून दिलेल्या टेलिस्कोपमुळे विद्यार्थ्यांना आकाशातील ग्रह आणि तारे जवळून पाहण्याची संधी मिळत आहे.
दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मारकबोडी येथे टेलिस्कोप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना आकाशातील चंद्राचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात आले.
LLF च्या प्रोग्राम मॅनेजर रूपा भट्टाचार्य, गडचिरोली जिल्हा मॅनेजर उज्वल गोरे आणि वाशीम जिल्हा मॅनेजर शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली LLF चे जिल्हा समन्वयक अश्विन कोपुलवार आणि सिनियर ऑफिसर राकेश लोणारकर यांनी हा मेळावा आयोजित केला.
या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक गणवीर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गिरीधर सोदूरवार तसेच लोकेश मेश्राम यांची उपस्थिती लाभली.