आष्टी – जिल्हा प्रतिनिधी दिनांक:-21/03/2025
आष्टी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदाची निवडणुक प्रक्रिया दिनांक 19 मार्च बुधवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी सौ.रेश्मा जमनदास फुलझेले यांची बिनविरोध निवड झाली.
आष्टी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशील डोर्लीकर यांची शासकीय नोकरीत नियुक्ती झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त होते. उपसरपंच पदासाठी रेश्मा फुलझेले यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक अधिकारी म्हणून आष्टीचे मंडळ अधिकारी वि. ना. ढोरे, तलाठी सचिन गुरूनुले यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी लिलाधर मिसार, सरपंच सौ. बेबीताई बुरांडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश बेलसरे , कपिल पाल, संतोष बारापात्रे, दिवाकर कूंदोजवार,छोटू दुर्गे, आशिष बावणे,सौ. लाजवंती औतकार , विद्या जूनघरे, पूनम बावणे, वैशाली आंबटकर यांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व सदस्यांनी नवनियुक्त उपसरपंच रेश्मा फुलझेले यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. सरपंच व उपसरपंच पदावर महीला असल्याने आष्टी ग्रामपंचायतीवर आता महीलाराज असणार आहे