गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-22/03/2025
आज, दिनांक २२ मार्च रोजी शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आयोजित पदाधिकारी आढावा बैठक व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या बैठकीत माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
“नवे चेहेरे पक्षात दाखल”
या कार्यक्रमात हसीना शेख, नामदेव उडान, उत्तम कोवे, शीतल दूधबावरे, अर्चना कारपेमवार, रूपाली दूधबावरे, मंगेश मळावी, दीपक मेश्राम, आकाश गेडाम, सुरेश तलांडे आणि सुनील नागपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी नवप्रवेशितांचे पक्षाचा दुपट्टा टाकून स्वागत केले.
“पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि स्वागत”
या कार्यक्रमात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
“बैठकीला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती”
या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी आमदार रामकृष्ण मडावी, जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल कोवे, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा तनुश्रीताई आत्राम, प्रदेश सरचिटणीस अलोणे ताई, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव आत्राम आणि अहेरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.