सिरोंचा(कोर्ला,) तालुका प्रतिनिधी दिनांक:- 27 मार्च 2025:
अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल कोर्ला गावात तहसीलदार होनमोरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचे लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात तहसीलदार होनमोरे यांनी स्वतः उपस्थित राहून योजनांची अंमलबजावणी तात्काळ केली.
तहसीलदार होनमोरे यांचा पुढाकार:
दुर्गम भागातील नागरिकांना प्रमाणपत्रे, योजनांचे लाभ आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळावीत, यासाठी तहसीलदार होनमोरे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी ग्रामस्थांची समस्या समजून घेत, संबंधित विभागांना तात्काळ सूचना दिल्या आणि अनेक प्रकरणांचे तत्काळ निवारण केले.
“प्रशासन केवळ कार्यालयापुरते मर्यादित न राहता, थेट गावपातळीवर येऊन सेवा द्यायला हवी,” असे प्रतिपादन करत होनमोरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
शिबिरातील ठळक बाबी:
61 जाती प्रमाणपत्रे: लाभार्थ्यांना तात्काळ प्रमाणपत्रे वितरित.
3 अधिवासी प्रमाणपत्रे: प्रलंबित प्रकरणांचे तातडीने निकाली लावले.
18 श्रावण-बाळ योजना: लाभार्थी महिलांना त्वरित योजना मिळवून दिल्या.
3 जन्म दाखले: नवजात बालकांच्या दाखल्यांचे त्वरित वितरण.
अनेक विभागांची उपस्थिती:
या शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले. मंडळ अधिकारी डोंगरे, वैद्यकीय अधिकारी सपकाळ, शिक्षक राठोड, परिसर आरोग्य सेविका, आशा वर्कर्स, संगणक चालक आणि ग्रामसेवक आदींनी सहकार्य करून शिबिर यशस्वी केले. हा शिबिर यशस्वीतेसाठी कोर्लाचे तलाठी पोरतेट यांनी मोलाचे सहकार्य केले
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या या पुढाकाराचे कौतुक करत “शासनाची सेवा आता थेट आमच्या दारात पोहोचतेय,” असे समाधान व्यक्त केले. कोर्ला येथील नागरिकांनी तहसीलदार होनमोरे आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
प्रशासनाची पुढील दिशा
तहसीलदार होनमोरे यांनी अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करून दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आणि सहज सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.