*अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक:-2703/2025
येथील एकलव्य माॅडेल निवासी शाळेत मुलांच्या वसतीगृहाचे अधिक्षक ईश्वर शेळके यांनी कोवळ्या निष्पाप विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केली याची माहिती मिळताच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज एकलव्य शाळेत धडकले. मारहाणीला बळी पडलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन आपबिती ऐकली. राजे साहेबांना बघुन विद्यार्थ्यांना हिम्मत आली व एक-एक म्हणता बर्याच विद्यार्थ्यांनी त्यांचेवर झालेल्या अत्याचाराबद्दल वाचा फोडली.हळूहळू अधिक्षक शेवाळे याचे बरेच कारनामे ऊघडकीस आले. मूलांकडून मालिश करवुन घेणे, स्वतःचे कपडे मुलांना धुण्यास सांगणे.रात्री-बेरात्री विद्यार्थ्यांना बेदम मारणे अथवा अशक्यप्राय परिश्रम करण्याची शिक्षा देणे असे कित्येक प्रकार बाहेर पडले. राजे साहेबांनी आस्थेने मुलांशी संवाद साधुन हिम्मत दिली.असले अमानुष प्रकार पुन्हा घडू नये असे प्राचार्यांना खडसावून सांगीतले. मी ही शाळा विद्यार्थी घडावेत,चांगले अधिकारी, खेळाडू माझ्या समाजातून निर्माण व्हावे यासाठीच मी इंग्रजी माध्यमाची केंद्रीय पाठ्यक्रमाठी शाळा आणली इथे मागिल काही काळापासुन अनेक गंभीर तक्रारी येत असल्याचे बोलले.त्यासोबतच शाळा,भोजनकक्षाची पाहणी केली.मुलींच्या वस्तीगृहाला भेट देऊ विद्यार्थीनींशी संवाद साधला व त्यांच्या सुध्दा समस्या जाणून घेतल्या. संवादात मुलींनी समस्यांचा पाढाच वाचला तेव्हा वरिष्ठांशी संपर्क साधून लवकरात लवकर समस्या निकाली लावण्याची हमी दिली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीचे प्रकल्प अधिकारी श्री कुशल जैन यांची भेट घेऊन अधिक्षक शेवाळेला सर्वप्रथम तात्काळ बडतर्फ करुन त्यास कठोर सजा देण्याची मागणी केली आणि एकलव्य शाळेत मुलांनी सांगितलेल्या समस्या सोडवुन देण्याची मागणी केली.गरज पडल्यास शासनाकडून मदत मिळण्यासाठी माझे देखील सहकार्य राहील असे आश्वस्त केले.!