अहेरी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-03;04/2025
आर्थिक दुर्बल तसेच हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मिन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेत अहेरीच्या पी. एम. श्री. मॉडेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.या मध्ये कु. आरुष महेश बेझंकीवार याने 110 गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. समीक्षा बालाजी देथे हिने 95 गुण मिळवत द्वितीय स्थान पटकावले आहे.
NMMS शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती:
NMMS शिष्यवृत्ती योजना भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत (Ministry of Human Resource Development) राबविण्यात येणारी राष्ट्रीय योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत दरवर्षी 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2007-08 पासून ही योजना सुरू आहे आणि दरवर्षी हजारो विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होतात.
पी. एम. श्री. मॉडेल हायस्कूल, अहेरीच्या विद्यार्थ्यांचा उत्तम निकाल:
सत्र 2024-25 साठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2025 मध्ये जाहीर झाला. गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी 1 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.या परीक्षेत पी. एम. श्री. मॉडेल हायस्कूल, अहेरीच्या तब्बल 16 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे.
पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची नावे आणि गुण:1. आरुष महेश बेझंकीवार – 110 (प्रथम क्रमांक)2. समीक्षा बालाजी देथे – 95 (द्वितीय क्रमांक)3. रहेमान कुरेशी – 91,4. शिरीष चव्हाण – 91 5. माही रामटेके – 846,. श्रेयस दुर्योधन – 86,7.नव्या पोनालवार – 74,,8. सोहम अरुण मुक्कावार – 74,,,,9. सोहम सूर्यकांत मोरे – 79,,,,,10. धनुष जोडे – 62,,,,11. शितल झाडे – 78,,,12. तेजस धुळसे – 74,,,13. साक्षी आलम – 64,,,,14. लुझान प्रवीण पेंदोर – 67,,15. आराध्या दुर्गे – 65,,,16. पार्थ दुर्योधन – 67
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ:
दिनांक 02 एप्रिल 2025 रोजी अहेरी येथे शाळेच्या सभागृहात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या वेळी मा. श्री. राजदेव रिचुकू, श्री. विनोद पुसाववार, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल आईवार, मुख्याध्यापक श्री. प्रमोद रोहणकर, पालकवर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांनी शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकवर्गाने देखील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे भविष्यासाठी उद्दिष्ट. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांनी यशाची वाटचाल पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी इंजिनियरिंग आणि मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्याची इच्छा दर्शवली, तर काही विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी करण्याचा मानस व्यक्त केला.
NMMS परीक्षेत मिळालेले यश आणि शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी असून, भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षक आणि पालकांनी केले.