गडचिरोली विदर्भ न्यूज २४ नेटवर्क दिनांक:-03/04/2025
गोंडवाना विद्यापीठाची वार्षीक अधिसभेची सभा दिनांक 12 मार्च व तहकूब झालेली सभा दिनांक 24 मार्च 2025 रोजी विद्यापीठाच्या सभागृहात पार पडली. सदर सभेत गोंडवाना विद्यापीठ कार्यक्षेत्राकरीता स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाची निर्मीती करण्यात यावी असा प्रस्ताव अधिसभा सदस्य श्री. पडोळे यांनी अधिसभेपुढे ठेवला.
सन 2011 मध्ये शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर ची विभागणी करुन चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांकरीता स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मीती केली. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मीतीस जवळपास 13 वर्षाचा काळ झाला मात्र अद्यापही सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे स्तरावरील कामकाजाकरीता विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाज्यांना शेकडो किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र गडचिरोली जिल्ह्याचे सिरोंचा या राज्याच्या टोकापर्यंत तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती, कोरपणा या टोकापर्यंत विस्तृत स्वरूपाचे आहे. महाविद्यालयांची सहसंचालक स्तरावरील कार्यालयीन कामे करण्याकरीता संबंधीत कर्मचारी यांना शेकडो किलोमिटरचा त्रासदायक प्रवास करावा लागत आहे. नागपूर येथे एखादे काम घेवून जाणे व ते आटोपून परतने अशा एका फेरीकरीता 4-5 दिवसाचा कालावधी लागतो आहे. अशा एखाद्या कामाकरीता कित्येक फेज्या कर्मचाज्यांना माराव्या लागत असतात. डिजीटल युगात कामे तत्परतेने होणे अपेक्षीत असतांना नुसत्या प्रवासात आणि मोठ्या अंतरामुळे कामे खोळंबत आहेत. यामुळे वेळ, श्रम व पैशाचा अपव्यय होत आहे.
सद्यास्थितीत विभागीय सहसंचालक कार्यालय नागपूर यांचेकडे 3-4 विद्यापीठांचा तसेच नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा असा 6 जिल्ह्यांतील हजारो महाविद्यालयांचा मोठा भार असुन सहसंचालक कार्यालयात कार्यरत कर्मचारी संख्या पुरेशी नसल्यामुळे गोंडवाना विद्यापीठाशी संबंधीत कामकाजांच्या संदर्भात मोठी दिरंगाई जाणवत आहे. यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाज्यांना बराच नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर या विद्यापीठाची स्थापना सन 2004 मध्ये झाली असून त्याचे कार्यक्षेत्र केवळ सोलापूर या एकाच जिल्ह्यापुरते मर्यादीत आहे. सन 2004 मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठाकडे संलग्नीत महाविद्यालयांची संख्या केवळ 110 असूनही प्रशासकीय कामकाज विहीत वेळेत व जलद गतीने होण्याच्या दृष्टिने शासनाने सन 2010 मध्ये स्वतंत्र सहसंचालक कार्यालयाची स्थापन केली. सोलापूर विद्यापीठाच्या तुलनेत गोंडवाना विद्यापीठाकडे संलग्नीत महाविद्यालयांची संख्या दुप्पट म्हणजे 218, जिल्हे दुप्पट म्हणजे 2 व क्षेत्रफळाच्या दृष्टिने अतिशय विस्तृत स्वरूपाचे गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे.
स्वतंत्र सहसंचालक कार्यालयाची निर्मीती झाल्यास आदिवासी बहुल गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात निश्चितच भर पडेल. तसेच सहसंचालक स्तरावरील कामकाजांमध्ये निश्चितीच गतीमाणता निर्माण होवून याचा फायदा विद्यापीठास व संलग्नीत महाविद्यालयांतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व इतरही घटकांना होईल. असा विश्वास सतिश पडोळे यांनी व्यक्त करीत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कार्यक्षेत्राकरीता स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय निर्मीतीचा प्रस्ताव अधिसभा सदस्य सतिश पडोळे यांनी अधिसभेपुढे ठेवला.
सोबतच विद्यापीठाच्या नवीन प्रस्तावीत अडपल्ली-गोगाव येथील जमिनीवर सहसंचालक कार्यालयाकरीता जागा आरक्षीत करुन शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात यावे व त्याचा सतत पाठपुरावा करण्यात यावा अशी पडोळे यांची विनंती अधिसभेचे अध्यक्ष यांनी मान्य केली. प्रस्तावास अधिसभा सदस्य डॉ. मिलींद भगत यांनी अनुमोदन दिले व अधिसभेमध्ये एकमताने ठराव पारित झाला.