आष्टी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-15 एप्रिल 2025
ईल्लुर येथील राजश्री शाहू महाराज अभ्यासिकेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जिवन चारित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला. महामानवाच्या जयंतीदिनी राज्य राखीव दल अमरावती येथे कार्यरत ईल्लुर येथील प्राशिक दुर्गे या जवानाने जयंती कार्यक्रमाला दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. व सामाजिक ऋण म्हणून अभ्यासिकेला पाच हजार रूपयांची स्पर्धा परीक्षा व ईतर पुस्तके भेट दिली. व यातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
जयंती कार्यक्रमानिमित्त अभ्यासिकेच्या वतीने थंड पाणी व सरबत चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नीलेश कुंदावार, प्रास्ताविक किरण भाऊ बामनकार तर आभार भारती दडमल यांनी मानले . या कार्यक्रमाला अक्षता लांबाडे , कल्याणी वालदे, आरती भांडेकर, सुदेशना शेंडे ,अनुराधा मंडरे, ,साहिल चौधरी ,चेतन बोरकुटे, श्रीनिवास सोयाम,संकेत लांबडे विशाल सावळे ,गुंजन बामणकर प्रज्वल टाकलपलीवार अक्षय गेडाम, अक्षय ठाकूर,आदींनी सहकार्य केले