गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक:- 15 एप्रिल 2025
गडचिरोली जिल्हयातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेमुळे गर्भवती मातेला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे घडली.
मनीषा शत्रुघ्न धूर्वे वय 31 वर्ष रा. वीसोरा तालुका देसाईगंज असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे.
मनीषा धूर्वे हीच्या पहिल्या प्रसूतीसाठी विसोरा येथील प्राथमिक रुग्णालयात भरती करण्यात आले. तपासणी केल्यानंतर बराच वेळ प्रसूती न झाल्याने मनिषाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावून तिला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, विसोरा येथील उपकेंद्रातील डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी ‘आणखी थोडा वेळ थांबा, मनिषाची प्रसूती येथेच होईल’, असे तिच्या कुटुंबीयांना सांगून रुग्णवाहिका परत पाठवली. परंतु तब्बल १२ तास उलटूनही मनिषा प्रसूत झाली नाही. शेवटी तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनीही प्रसूती होईल, असे सांगितले. परंतु प्रसूती न झाल्याने मनिषाच्या कुटुंबीयांना १४ एप्रिलच्या संध्याकाळी तिला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी मनिषाला मृत घोषित केले. तिच्या बाळाचाही पोटातच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांनी डॉक्टर व नर्स वर कारवाईची मागणी करत संताप व्यक्त केला या घटनेनंतर डॉक्टर व नर्स परिचारिकेची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. या घटनेनं गडचिरोली जिल्हयातील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
#गडचिरोली
#आरोग्यव्यवस्था
#मृत्यू
#गर्भवतीमृत्यू
#डॉक्टरांचीनिष्काळजी
#ग्रामीणआरोग्य
#हॉस्पिटल
#आरोग्यखातं
#BreakingNews
#FlashNews
#MarathiNews
#विदर्भ
#HealthCrisis