विशेष संपादकीय दिनांक 19 एप्रिल 2025
नवेगाव येथील निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने दाखवलेली कार्यक्षमता ही केवळ तपासाची यशोगाथा नसून, हे नेतृत्व, नियोजन आणि तांत्रिक क्षमतेच्या एकत्रित प्रयत्नाचे उत्तम उदाहरण आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे नेतृत्व विशेषत्वाने अधोरेखित करावे लागेल.
एका अनोळखी आरोपीने केलेला निर्घृण खून, कोणताही थेट पुरावा उपलब्ध नाही, साक्षीदारही मर्यादित… अशा स्थितीत प्रकरण उकलणे हे केवळ यंत्रणांच्या चपळतेवर नव्हे तर नेतृत्वाच्या दृष्टिकोनावरही अवलंबून असते. हेच नीलोत्पल यांनी सिद्ध केले. त्यांनी गुन्ह्याच्या गांभीर्याची जाणीव ठेवून तपासासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली, प्रत्येक बाजूने माहिती संकलनाचे आदेश दिले आणि तांत्रिक पुराव्यांचा काटेकोर उपयोग करून संशयितापर्यंत पोहोचले.
नीलोत्पल यांची कार्यशैली ही केवळ नियमांपुरती मर्यादित राहणारी नसून, ती लोकाभिमुख आणि न्यायाच्या मूलभूत तत्वांशी निष्ठावान आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील जिल्ह्यात पोलिस दलाचे मनोबल उंचावण्याचे काम त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आहे. गुन्हेगाराला वेळेत अटक करून न्यायव्यवस्थेच्या स्वाधीन करणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य असले तरी त्यासाठी लागणारे धैर्य, शिस्त आणि टीमवर्क ज्या पद्धतीने नीलोत्पल यांच्या नेतृत्वात दिसले, ते निश्चितच प्रेरणादायी आहे.
या प्रकरणातून एक बाब स्पष्ट होते – योग्य नेतृत्व, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या समन्वयातून कोणताही गुन्हा उकलता येतो. नीलोत्पल यांनी हा विश्वास जनतेला पुन्हा एकदा दिला आहे.
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलिसिंग हे केवळ कायदा-सुव्यवस्था राखणे नाही, तर लोकांमध्ये सुरक्षा व विश्वास निर्माण करणे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. या कसोटीवर नीलोत्पल सर शंभर टक्के उतरले आहेत.
त्यांच्या कार्यशैलीस सलाम करताना, आपण सर्वांनी पोलिस दलाच्या प्रयत्नांना आणि त्यांच्या धाडसाला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. अशी कार्यक्षम नेतृत्वं पोलिसिंगची खरी ओळख ठरतात.
विशेष संपादकीय संदीप राचर्लावार मुख्य संपादक विदर्भ 24 नेटवर्क9421729671
#गडचिरोलीपोलीस #नीलोत्पल #पोलीसअधिक्षक #गुन्हेउकल
#WomenSafety #PoliceLeadership #CrimeInvestigation
#मुलभूतन्याय #गडचिरोली #LawAndOrder #PoliceSuccess #MurderCase
#CriminalArrest #MarathiNews
#EditorialOpinion