गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-18/04/2025
दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:00 ते 2:30 दरम्यान, नवेगाव येथील कल्पना विहार परिसरात राहणाऱ्या निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (वय 64 वर्षे) यांचा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या राहत्या घरी डोक्यावर कठीण वस्तूने वार करून निर्घृण खून केला.
या प्रकरणी त्यांचे भाऊ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री. मोहन सोनकुसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, गडचिरोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज जगताप यांच्या नेतृत्वात तीन तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान, विशाल ईश्वर वाळके (वय 40), सध्या कल्पना विहार येथे भाडेकरू म्हणून राहणारा, याच्यावर संशय बळावला. सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला 18 एप्रिल रोजी अटक केली.
तपासात असे निष्पन्न झाले की, कर्जबाजारीपणामुळे आणि उसनवारीच्या पैशांमुळे त्याने चोरीसाठी कल्पना उंदिरवाडे यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या डोक्यावर शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर अंगावरील दागिने घेऊन तो पळून गेला.
पुरावे अत्यंत कमी असतानाही, गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत क्लिष्ट अशा या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळवले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला 18 एप्रिल ते 22 एप्रिल 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
#गडचिरोलीहत्या #महिला अधिकारी खून#गडचिरोलीपोलीस
#क्राईमन्यूज#नवेगावहत्या#गुन्हेगारी#पोलीसकारवाई
#BreakingNews#मर्डरकेस#महाराष्ट्रपोलीस#KalpanaUndirwade#VishalWalkheArrest#CrimeInvestigation#PoliceCustody