गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक 19 एप्रिल 2025
जिल्ह्यातील भामरागड उपविभागात दिरंगी-फुलनार जंगल परिसरात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चकमकीत सी-60 कमांडोचा बळी गेला होता. या घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या चार जहाल माओवादी नेत्यांना गडचिरोली पोलिस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या उपस्थितीत मोठा फटका बसला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेष IG संदीप पाटील व DIG अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटकेत आलेल्यांमध्ये दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव सायलु भुमय्या ऊर्फ रघु, त्याची पत्नी व भामरागड एरिया कमिटीची सचिव जैनी खराटम, तसेच झाशी तलांडी व मनिला गावडे या भामरागड दलमच्या महिला सदस्यांचा समावेश आहे.
माओवाद्यांचे भयंकर गुन्हेगारी इतिहास:
सायलु रघु याच्यावर तब्बल ७७ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये ३४ चकमकी, २३ खून, ७ जाळपोळ यांचा समावेश आहे. तर जैनीवर २९ गुन्हे नोंद असून १८ चकमकी व ४ खून त्यात आहेत. उर्वरित दोन महिलांवरही अनेक गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत.
रेकी करताना अटक:
भामरागड तालुक्यातील पल्ली जंगल परिसरात हे माओवादी रेकी करत असताना CRPFच्या 09 बटालियन व ताडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांना संशयास्पद हालचाली करताना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपल्या ओळखी कबूल केल्या.
शासनाने जाहीर केलेली बक्षीसे:
या चार माओवादी नेत्यांवर एकूण ४० लाखांचे बक्षीस जाहीर होते. सायलु रघुवर २० लाख, जैनीवर १६ लाख तर उर्वरित दोघींवर प्रत्येकी २ लाखांचे बक्षीस होते.
-
पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया:
-
या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले असून, गडचिरोलीत माओवादी विरोधी कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
#Gadchiroli
#MaoistArrest
#Naxalwadi
#C60Commando
#CRPF
#AntiNaxalOperation
#GadchiroliPolice
#MaoistSurrender
#NaxalAffectedArea
#BreakingNews
#SecurityForces
#JungleOperation
#GadchiroliNews
#Bharmragad
#MaharashtraPolice
#NaxalUpdate
#SurrenderOrPerish