# *नगरपरिषद मतदारसंघात मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी* – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

*नगरपरिषद मतदारसंघात मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी*

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-01/12/2025

राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार दिनांक २ डिसेंबर 2025 रोजी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचे दिनांक २६ नोंव्हेंबर २०२५ रोजीचे राजपत्रानुसार गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, देसाईगंज आणि गडचिरोली नगरपरिषद मतदारसंघात ही सुटी जाहिर झाली आहे. ही सार्वजनिक सुटी उपरोक्त नमूद मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या-त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच सदर नगरपरिषद क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुटी लागू राहील असेही राजपत्रात नमूद आहे.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!