“कर्मयोगी प्रशासक अविश्यांत पंडा : विश्वास, विकास आणि पारदर्शकतेचा गडचिरोली मॉडेल”
“गडचिरोलीचा नवा चेहरा – अविश्यांत पंडा यांचे कर्मयोगी प्रशासन” पुरस्कार, पारदर्शकता आणि कठोर निर्णयांच्या माध्यमातून गडचिरोलीत निर्माण झाला नवा प्रशासनिक आदर्श.

संदीप राचर्लावार ( मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 विशेष संपादकीय) दिनांक:₋18/10/20025
गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक आणि संवेदनशील जिल्ह्यात “उत्कृष्ट प्रशासन” हे केवळ पदावरून नाही, तर जनतेच्या मनावरून मिळवले जाते. गेल्या काही वर्षांत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ज्या प्रकारे सर्वांगीण विकासाची दिशा घेतली, त्यामागे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यपद्धती आहे.
“आधी कर्मयोगी, नंतर अधिकारी” — हे सूत्र त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट प्रशासन” या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणारा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणजे गडचिरोली. या सन्मानाने जिल्ह्याची प्रतिमा केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उजळून निघाली.
पांडा यांच्या कार्यकाळात प्रशासनाचा मुख्य भर “जनतेशी थेट संवाद” आणि “प्रभावी अंमलबजावणी” यावर राहिला आहे. ते केवळ आदेश देणारे अधिकारी नसून, शेतात, शाळेत, आरोग्य शिबिरात आणि आदिवासी पाड्यांवर थेट पोहोचणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. आरोग्य, शिक्षण, शेती, महिला सबलीकरण, पोषण आणि मलेरिया निर्मूलन अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी कार्यसंस्कृतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
गेल्या आठवड्यातील कार्यक्रमांच्या मालिकेने याचेच प्रतिबिंब दाखवले —
ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे, विद्यार्थी प्रेरणादिन, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, शासकीय योजनांचा आढावा बैठक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाचे पारदर्शक कामकाज यामुळे जिल्हा ‘सकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू’ बनला आहे.
अविश्यांत पंडा यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा आता केवळ शासकीय आकड्यांपुरता नाही, तर मानवी विकासाच्या भावनिक नकाशावर झळकतो आहे. त्यांनी दाखवून दिलं की, जबाबदारीने चालवलेलं प्रशासन हे जनतेसाठी विश्वासाचं घर ठरू शकतं.
गडचिरोलीसाठी त्यांच्या कार्यशैलीची ओळख म्हणजे –
“कर्मयोगातून विश्वास, आणि विश्वासातून विकास”
ही ओळ आज प्रत्येक गडचिरोलीकरांच्या ओठांवर आहे.
आज त्यांच्या योगदानाचा स्मरण करताना असं ठामपणे म्हणता येईल की –
गडचिरोली जिल्ह्याने एका अधिकाऱ्याच्या रूपात कर्मयोगी नव्हे, तर प्रेरणादायी जननेता पाहिला आहे.
गेल्या आठवड्यातील कार्यक्रमांच्या मालिकेने याचेच प्रतिबिंब दाखवले —
ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे, विद्यार्थी प्रेरणादिन, महिला सक्षमीकरणाचे उपक्रम, शासकीय योजनांचा आढावा बैठक, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाचे पारदर्शक कामकाज यामुळे जिल्हा ‘सकारात्मक ऊर्जेचा केंद्रबिंदू’ बनला आहे.
याच काळात जिल्ह्यात गाजत असलेल्या रेती तस्करीच्या प्रकरणावर त्यांनी दाखवलेली तातडीची प्रतिक्रिया आणि घेतलेले कठोर निर्णय प्रशासनातील त्यांच्या निर्भयतेचे आणि निष्पक्षतेचे द्योतक आहेत. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या बेकायदेशीर धंद्यावर पांडा यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता थेट कारवाई केली. यामुळे केवळ शासकीय महसुलाचे संरक्षण झाले नाही, तर प्रामाणिक प्रशासनावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.
त्यांच्या या निर्णयामुळे गडचिरोली जिल्हा प्रशासनाने “कायद्यापुढे सर्व समान” ही भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.
अविश्यांत पंडा यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा आता केवळ शासकीय आकड्यांपुरता नाही, तर मानवी विकासाच्या भावनिक नकाशावर झळकतो आहे. त्यांनी दाखवून दिलं की, जबाबदारीने चालवलेलं प्रशासन हे जनतेसाठी विश्वासाचं घर ठरू शकतं.
गडचिरोलीसाठी त्यांच्या कार्यशैलीची ओळख म्हणजे –
“कर्मयोगातून विश्वास, आणि विश्वासातून विकास”
ही ओळ आज प्रत्येक गडचिरोलीकरांच्या ओठांवर आहे.
आज त्यांच्या योगदानाचा स्मरण करताना असं ठामपणे म्हणता येईल की –
गडचिरोली जिल्ह्याने एका अधिकाऱ्याच्या रूपात कर्मयोगी नव्हे, तर प्रेरणादायी जननेता पाहिला आहे…..