# लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचा पूरग्रस्त साताऱ्यांना आधार : ३ हजारांहून अधिक मदत किटचे वाटप… – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हाताज्या घडामोडी

लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनचा पूरग्रस्त साताऱ्यांना आधार : ३ हजारांहून अधिक मदत किटचे वाटप…

३ हजारांहून अधिक मदत किटचे वाटप

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:–02 सप्टेंबर 2025 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्याने नद्या-नाल्यांचा तांडव सुरू असून गावोगाव शेकडो कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले आहे. पिण्याचे पाणी, अन्नधान्य, वस्त्र अशा मूलभूत गरजांची टंचाई निर्माण झाली असताना लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर शाखेने, लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनने (एलआयएफ) या संकटाच्या काळात पुढाकार घेतला आहे.

२५ ऑगस्टपासून एलआयएफची टीम पूरग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभी राहून मदत कार्य राबवित आहे. आतापर्यंत ३,००० हून अधिक आवश्यक मदत किट तयार करण्यात आले असून या किटमध्ये तांदूळ, डाळ, तेल, कणिक, मसाले, साबण, टूथपेस्ट, ब्लँकेट आणि पिण्याच्या पाण्याचे कॅन अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.

१ सप्टेंबरपर्यंत नागपूर येथून १२ ट्रकमध्ये भरलेले २,५४६ क्रेट थेट साताऱ्यातील पाटण तालुक्यात पाठविण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने हे सर्व साहित्य बाधित गावांपर्यंत पोहोचविले जात आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना एलआयएफच्या प्रतिनिधीने सांगितले –
“लोकांच्या सर्वात कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे प्राधान्य आहे. सातारा जिल्ह्यातील कुटुंबांना मदत करण्यासाठी हे एक छोटेसे पाऊल आहे आणि आमची टीम गरजूंना मदत करण्यास तत्पर राहील.”

लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनने याआधीही सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविला असून, आपत्तीच्या काळात संवेदनशीलतेने मदतीचा हात देणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.—

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!