चामोर्शी तालुका प्रतिनिधी दिनांक:- 21 एप्रिल 2025
तालुक्यातील शेकडो बंगाली बांधव व भगिनींनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धनुष्य बाण हाती घेतला.
शिवसेना बंगाली आघाडी आयोजीत पक्ष प्रवेश सोहळा दिनांक 21 एप्रिल रोजी चामोर्शी तील विश्रामगृहात पार पडला. चामोर्शी तालुक्यात मोठ्या संख्येने बंगाली बांधव राहतात. यांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला व प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवत सपना मंडल यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील महिलांनी पक्षात प्रवेश केला. तसेच अनेक पुरुष कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला.
गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल, पुर्व विदर्भ संघटक किरण पांडव, पुर्व विदर्भ शिवसेना उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर, यांच्या मार्गदर्शनात पक्ष संघटना बांधणी चे कार्यक्रम जिल्हाभरात सुरु असुन शेकडो बंगाली बांधव व महिलांच्या वपक्ष प्रवेशामुळे पक्ष संघटना बांधणीच्या मजबुती करणाचे पाऊल जिल्हा शिवसेनेने टाकले आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे .मा.असितजी तुषार मिस्त्री शिवसेना(बंगाली आघाडी)श्रीदेवी वरगंटीवार शिवसेना गडचिरोली विधानसभा महिला जिल्हा प्रमुख,कपिल विश्वास शिवसेना उपजिल्हा प्रमुख (बंगाली आघाडी),मा.अविनाश वरगंटीवार शिवसेना उपजिल्हा प्रमुख,मा.पप्पी पठाण शिवसेना तालुका प्रमुख चामोर्शी,मा.अमितजी यासलवार शिवसेना चामोर्शी शहर प्रमुख,अविनाशजी पुच्छलवार युवासेना तालुका प्रमुख चामोर्शी,मा.सोनुभाऊ पेरगुरवार युवासेना तालुका संघटक,मा.संजय परमाणिक शिवसेना तालुका प्रमुख (बंगाली आघाडी) चामोर्शी यासह जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.