गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक 22 एप्रिल 2025 भारतीय जनता पक्षाने गडचिरोली जिल्ह्यात संघटनात्मक मजबुतीसाठी मोठा निर्णय घेत, पक्षांतर्गत फेरबदल करत १५ मंडळ अध्यक्षांची घोषणा केली आहे. ‘संघटनपर्व अभियान’ अंतर्गत करण्यात आलेल्या या खांदेपालटीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ही घोषणा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी २० एप्रिल रोजी अधिकृतरीत्या केली.
नवीन मंडळ अध्यक्षांची घोषणा होताच भाजपच्या वतीने प्रत्येक तालुका ठिकाणी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गडचिरोली येथे या कार्यक्रमात आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, गोविंद सारडा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील नव्याने नियुक्त मंडळ अध्यक्ष पुढीलप्रमाणे –
गडचिरोली शहर – अनिल कुनघाडकर
गडचिरोली ग्रामीण – दत्तू सूत्रपवार
धानोरा – साजन गुंडावार
चामोर्शी – रोशनी वरघंटे
घोट-आष्टी – राकेश सरकार
आरमोरी – पंकज खरवडे
देसाईगंज शहर – सचिन खरकाडे
देसाईगंज ग्रामीण – सुनील पारधी
कुरखेडा – चांगदेव फाये
कोरची – सदाराम नरोटी
मुलचेरा – संजीव सरकार
एटापल्ली – प्रसाद पुल्लुरवार
अहेरी – विकास तोडसाम
सिरोंचा – श्रीनाथ राऊत
भामरागड – अर्जुन अलामा
पक्षाच्या सूत्रानुसार, या निवडींमागे कार्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार करण्यात आला असून स्थानिक पातळीवर पक्ष बळकट करणे हाच उद्देश आहे. तर, जिल्हाध्यक्ष पदासाठी लवकरच निवड प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी निरीक्षक म्हणून भंडारा जिल्ह्याचे हेमंत पटले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भाजपच्या या संघटनात्मक बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.