मुंबई विदर्भ न्यूज २४ नेटवर्क दिनांक :-31/05/2025. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ₹२०,००० इतका प्रोत्साहनपर बोनस लवकरच मिळणार असून, ही रक्कम येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव सिंगल यांनी दिली आहे.
ही घोषणा भाजपाचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर झाली आहे. त्यांनी हा मुद्दा विधानसभेत प्रभावीपणे मांडत शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर २५ मार्च रोजी शासनाने यासंदर्भात अधिकृत शासनादेश जारी केला होता, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी होती.
नोंदणी असले तरीही लाभ
यामध्ये विशेष बाब म्हणजे – शेतकऱ्यांनी धान विक्री केली असेल किंवा नसेल, फक्त नोंदणी केलेली असली तरीही २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. म्हणजेच सर्व नोंदणीकृत धान उत्पादकांना लाभ मिळणार असून, त्यासाठी विक्रीची अट नाही.
शेतकऱ्यांप्रती मुनगंटीवार यांची संवेदनशीलता
यापूर्वीही सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी ₹२०२ कोटींचा पीक विमा मिळवून देण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची लढाऊ भूमिका आणि सातत्य