सिरोंचा (जि. गडचिरोली) | दिनांक – 13 जून 2025. सिरोंच्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक वैद्यकीय उपक्रम राबवण्यात येत आहे. हैदराबादच्या प्रसिद्ध एशियन व्हॅस्क्युलर हॉस्पिटल आणि संजिवनी मेडिकल हॉल, सिरोंचा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व्हॅस्क्युलर वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १५ जून २०२५ रोजी (रविवारी) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार आहे.
हे शिबिर विशेषतः रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांवर केंद्रित असून, रोगनिदान, वैद्यकीय सल्ला आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची सुविधा या शिबिरात मोफत दिली जाणार आहे. रु. ५०००/- किंमतीच्या तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
प्रमुख पाहुणे:
या शिबिराला चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे मतदारसंघाचे माजी खासदार श्री. अशोक नेते आणि संजिवनी मेडिकल हॉलचे संचालक संदीप राचर्लावार श्री. श्रीनाथ राऊत मंडळ अध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कोणकोणत्या आजारांवर तपासणी होणार?
या शिबिरात खालील रक्तवाहिनीसंबंधी आजारांवर तपासणी केली जाणार आहे:
सुजलेली आणि मुडपलेली नस
कोंदल्याप्रमाणे दिसणाऱ्या नसा
पायांना अपुरा रक्तपुरवठा
पाय किंवा पायाच्या तळव्यांना सूज येणे
सोरायसिस
मेंदूला अपुरा रक्तपुरवठा
शिबिराचे ठिकाण:
जिल्हा परिषद हायस्कूल परिसर, सरकारी ग्रामीण रुग्णालयाजवळ, सिरोंचा
अधिक माहितीकरिता संपर्क:
7337321805 / 7337321806
9908760544 / 7981341619
—नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. विशेषतः ज्यांना रक्तवाहिन्यांचे विकार, नसांमध्ये सूज किंवा सूक्ष्म रक्ताभिसरणाशी संबंधित तक्रारी आहेत, त्यांनी यामध्ये सहभागी होणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.