ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
ADVERTISEMENT
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
No Result
View All Result
विदर्भ न्युज 24 नेटवर्क
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home आपले गडचिरोली

*राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा*

*कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *गडचिरोली जिल्ह्यातील द्रुतगती महामार्ग, रेल्वे मार्ग व विमानतळ प्रकल्पांना गती*

मुख्य संपादक by मुख्य संपादक
June 20, 2025
in आपले गडचिरोली
0
*राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा*
Spread the love

मुंबई, विदर्भ न्यूज २४ नेटवर्क दिनांक:-20/06/2025.                           राज्यातील महत्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचन दिल्या. यावेळी नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग, विरार – अलिबाग कॅरिडोर, जलना – नांदेड द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड पूर्व, पश्चिम व विस्तारीकरण, भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग, नवेगाव (मोर) – सुरजागड मिनरल कॅरिडोर, वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्ग या राज्यातील रस्ते प्रकल्पांच्या भूसंपादनाचा तसेच वर्धा – नांदेड, वडसा–गडचिरोली रेल्वे प्रकल्प आणि कोल्हापूर, कराड, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रकल्प रखडल्यामुळे त्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूसंपादनाच्या प्रक्रियेसाठी सर्व यंत्रणांना टाईमलाईन दिलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. सर्व यंत्रणा आणि संबंधित अधिकारी यांनी मिशन मोडवर काम करावे. भूसंपादनाची कामे गांभिर्याने घेऊन तातडीने मार्गी लावावीत. याबाबत सर्वांनी गुणात्मक आणि रचनात्मक काम करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग आराखडा गतीशक्तीवर रन करून त्याचा आराखडा तयार करून घ्यावा. जेणे करून कमीत कमी वन जमीन बाधित होईल. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या 12 हजार कोटींच्या निधीची वित्त विभागाने तरतूद करावी. विरार अलिबाग कॅरिडोरच्या मोरबे ते कारंजा टप्प्यामध्ये वन जमिन व कांदळवन असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या घेण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. तसेच या प्रकल्पाच्या परवानग्या घेत असतानाच प्रशासकीय प्रक्रिया समांतर सुरू ठेवावी. त्यामुळे कामास गती देता येईल. वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्गाचा समावेश सागरमाला योजनेत करण्याविषयीचा प्रस्ताव सादर करावा. जालना – नांदेड द्रुतगती महामार्गाचे परभणी जिल्ह्यातील सेलू येथील भूसंपादनाची प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करावी. विदर्भातील भंडारा – गडचिरोली, नागपूर – चंद्रपूर, नागपूर – गोंदिया या सर्व द्रुतगती मार्गांचा आराखडा गतीशक्तीवर रन करून अंतिम करुन घ्यावा. वडसा-गडचिरोली व वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया 15 दिवसात पूर्ण करून काम मार्गी लावण्यात यावे. अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

गडचिरोली विमानतळाचा ओएलएस करून घ्यावा आणि त्याचा प्रस्ताव गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी पाठवावा. तर अकोला येथील विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 2400 मीटर पर्यंत वाढवावी. अकोला येथे सुंदर आणि अत्याधुनिक तसेच मोठे विमानतळ उभारण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील विमानतळ प्रकल्पांचा आढावा घेताना केल्या. राज्यातील महात्वाकांक्षी 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या 53 हजार 354 कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

*गडचिरोली जिल्ह्यातील द्रुतगती महामार्ग, रेल्वे मार्ग व विमानतळ प्रकल्पांना गती*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग आणि वडसा – गडचिरोली रेल्वे मार्ग यांसारख्या गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांचे भूसंपादन निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देत वडसा – गडचिरोली रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले.
तसेच गडचिरोली विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक असलेला OLS (Obstacle Limitation Surface) सर्वेक्षण करून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
00000

Tags: #cmomaharashtra
Previous Post

कर्जदारांसाठी दिलासादायक सुधारणा : ‘सिबिल स्कोअर नियम २०२५’ लागू…..

Next Post

सामूहिक योग साधनेतून आरोग्याचा जागर – सिरोंचातील ऐतिहासिक उपक्रम….

मुख्य संपादक

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार मुख्य संपादक – विदर्भ न्यूज 24 नेटवर्क संदीप राचर्लावार हे पत्रकारितेतील एक समर्पित, निःपक्ष आणि निर्भीड व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी “विदर्भ न्यूज 24 नेटवर्क” या डिजिटल माध्यमाची स्थापना केली, यामागील उद्दिष्ट एकच – समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या समस्या, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न शासनाच्या दरबारी पोहोचवणे. त्यांचे लिखाण सडेतोड असून सत्य आणि समाजहिताला केंद्रस्थानी ठेवणारे आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत त्यांनी डिजिटल पत्रकारितेत नाविन्यपूर्ण प्रयोग घडवले आहेत. त्यांनी नवोदित पत्रकारांसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी कार्य केलं आहे. विदर्भासह महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील घटनांचा अचूक आणि वेळेवर आढावा घेणारे त्यांचे वृत्तांकन आज विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहे. त्यांचा पत्रकारितेतील विश्वास अगदी स्पष्ट आहे — "बातमी ही केवळ माहिती नव्हे, ती समाजपरिवर्तनाचे साधन असते." त्यांच्या नेतृत्वात "विदर्भ न्यूज 24 नेटवर्क" हे माध्यम प्रामाणिक, जागरूक आणि लोकाभिमुख पत्रकारितेचे एक मजबूत व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. संपर्क: मो. 9421729671 / 9423502555 ईमेल: sandeep.racharlasrc@gmail.com कार्यकारी संपादक * * *संजय भोयर* *082757 50589* Sandeep Racharlawar Editor-in-Chief – Vidarbha News 24 Network Sandeep Racharlawar is a dedicated, impartial and fearless personality in journalism. He founded the digital medium “Vidarbha News 24 Network”, with one goal – to bring the problems of people from all walks of life, especially farmers and the underprivileged in rural areas, to the attention of the government. His writing is straightforward and keeps truth and social interest at the center. He has created innovative experiments in digital journalism by making effective use of technology. He has done guiding and inspiring work for budding journalists. His reporting, which provides accurate and timely reviews of events in Vidarbha, Maharashtra, Telangana and Chhattisgarh, has become a symbol of credibility today. His belief in journalism is very clear — "News is not just information, it is a tool for social transformation." Under his leadership, "Vidarbha News 24 Network" has emerged as a strong platform for honest, conscious and people-oriented journalism. Contact: Md. 9421729671 / 9423502555 Email: sandeep.racharlasrc@gmail.com Executive Editor * * *Sanjay Bhoyar* *082757 50589*

Next Post
सामूहिक योग साधनेतून आरोग्याचा जागर – सिरोंचातील ऐतिहासिक उपक्रम….

सामूहिक योग साधनेतून आरोग्याचा जागर – सिरोंचातील ऐतिहासिक उपक्रम....

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
Plugin Install : Widget Tab Post needs JNews - View Counter to be installed
  • Trending
  • Comments
  • Latest
*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025

Recent News

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025
शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले; गडचिरोलीत सात बेकायदेशीर स्कूल व्हॅन जप्त, 1.25 लाखांचा दंड….

July 6, 2025
*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

July 4, 2025
विदर्भ न्युज 24 नेटवर्क

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

कार्यकारी संपादक:-संजय भोयर विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Follow Us

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Currently Playing

मुख्य संपादक संदीप राचर्लावार विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Oplus_131072

Browse by Category

  • Food
  • Gadget
  • Mobile
  • Music
  • News
  • Politics
  • Review
  • Science
  • Sports
  • Startup
  • Tech
  • Travel
  • Uncategorized
  • World
  • अग्रलेख
  • आपला सिरोंचा
  • आपले अहेरी
  • आपले एटापल्ली
  • आपले गडचिरोली
  • आपले चंद्रपूर
  • आपले चामोर्शी
  • आपले नागपूर
  • आपले विदर्भ
  • छत्तीसगड राज्य
  • तेलंगाना राज्य
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र
  • विशेष संपादकीय

VN24 Visitor

5 8 7 4 8 8
Users Today : 418
Total Users : 58748816
Views Today : 478
Total views : 58766944
Who's Online : 6
Your IP Address : 216.73.216.179
Server Time : 2025-07-06
Powered By WPS Visitor Counter

Recent News

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

*महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!*

July 6, 2025
भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ६ नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी?

July 6, 2025

‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ हे विदर्भासह महाराष्ट्र देश-विदेशातील राजकारण, प्रशासन यावर सत्य, परखड आणि निर्भीड वृत्तांकन तसेच विश्लेषणाचे एकमेव व दर्जेदार व्यासपीठ होय. ‘सत्ता, संघर्ष आणि सत्य’ याचा सखोल मागोवा घेऊन ताज्या, पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि निःपक्ष बातम्यांमधून वाचकांशी विश्वासाचे नाते तयार करणारे डिजीटल न्यूज पोर्टल म्हणून ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्क’ ओळखले जाते. राजकारण, प्रशासन अन् देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे वस्तुनिष्ठ अपडेट्स देणे, हाच ‘विदर्भ न्यूज 24 नेटवर्कच्या’ उद्देश आहे.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

No Result
View All Result
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • News
    • आपला सिरोंचा
  • आपले गडचिरोली
  • नवी दिल्ली
  • मुंबई महाराष्ट्र

© 2025 Website Designed By Aadvaith Global 9822668786

error: Content is protected !!