काटली येथील नाल्याजवळ अज्ञात वाहनाने सहा मुलांना चिरडले, पाच मुले ठार तर एक गंभीर
सकाळी ५.३० वाजता व्यायाम करीत असताना वाहण चढविले अंगावर...

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक:-07/08/2025
गडचिरोली – आरमोरी मुख्य मार्गावरील काटलीच्या नाल्याजवळ व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने त्यांना चिरडल्याची घटना आज दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली
सहा युवकापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर दोन मुलांना नागपूर येथील हलविण्यात आले आहे
मृतांमध्ये पिंकु नामदेव भोयर वय १४ ,तन्मय बालाजी मानकर वय १६, यांचा जागीच तर धनंजय कोहपरे वय 17 वर्ष रा.काटली यांचा रुग्णालयात मृत्यू झाला तर दिशांत दुर्योधन मेश्राम वय १४ व तुषार राजेंद्र मारभते वय १४ रा काटली या दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.क्षितीज तुळशिदास मेश्राम वय १४, आदित्य गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे
सदर अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तोबा गर्दी केली गडचिरोली पोलीस लागलीच घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य व तपास सुरू आहे
या दरम्यान गावकऱ्यांनी काटली येथील बसथांब्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे