# नगर भूमापन अपील प्रकरणातील लोक अदालत १६ सप्टेंबरला गडचिरोलीत – VIDARBHANEWS 24
विशेष वृतान्त

नगर भूमापन अपील प्रकरणातील लोक अदालत १६ सप्टेंबरला गडचिरोलीत

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-12/09/2025

नगर भूमापनच्या मालकी हक्काशी संबंधित महसुली अपील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही लोक अदालत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली येथे पार पडणार आहे.

या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, संबंधित प्रलंबित प्रकरणांतील पक्षकारांना याचा थेट लाभ होणार आहे.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख विजय भालेराव यांनी नागरिकांना या लोक अदालतीत सहभागी होऊन आपल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करून घेण्याचे आवाहन केले आहे.
००००

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!