गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 09,86,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
दिनांक- 01/11/2025
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 31/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पथकाने सापळा रचून अवैद्य दारूची वाहतुक करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 31/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे जिनेश मेश्राम रा. गोकुलनगर ता. व जि. गडचिरोली व आकाश भरडकर रा. गोकुलनगर ता. व जि. गडचिरोली हे चारचाकी वाहन क्र. एम. एच. 46 ए. एल. 0027 मधुन चातगाव मार्गे देशी व विदेशी दारुची वाहतुक व पुरवठा करणार आहेत. यावरून सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजा चातगाव कारवाफा टी पार्इंट येथे सापळा रचला असता, एक काळ्या तपकिरी रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम. एच. 46 ए. एल. 0027 टी पार्इंटच्या दिशेने येताना दिसून आली, यावरून रत्यात बॅरीकेट्स लावून अडथळा निर्माण करून पोलीसांनी वाहन चालकास हात दाखवून थंाबण्याचा ईशारा केला. परंतु सदर वाहन चालकाने वाहन न थांबविता वाहन मौजा साखेरा ते मौजा जांभळी गावाकडे जाणाया रोडवर उभी करुन वाहनातून दोन इसम खाली उतरुन अंधार व जंगलाचा फायदा घेत पळून गेले. यावेळी आरोपी नामे जिनेश मेश्राम रा. गोकूलनगर ता. जि. गडचिरोली हा पोलीस पथकास अंधार व जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळून जाताना दिसून आला.
त्यानंतर दोन पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनामध्ये 1) रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे 45 सिलबंद खाकी खरड¬ाचे प्रति बॉक्स 100 नग असे एकूण 4500 बॉटल विक्री किंमत 80 प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 3,60,000/- रुपये, 2) 500 मि. ली. मापाचे हायवर्ड 5000 कंपनीचे 05 सिलबंद खरड¬ाचे प्रति बॉक्समध्ये 24 टिन बिअर बॉटल असे एकूण 120 नग बिअर विक्री किंमत 350 रु. प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 42,000/- रुपये, 3) 500 मि. ली. मापाचे खरड¬ाच्या बॉक्समध्ये बडवायजर मॅग्नम सुपर प्रिमीयम बिअर 04 सिलबंद बॉक्समध्ये प्रति बॉक्स 24 टिन बिअर बॉटल असे एकूण 96 नग बिअर विक्री किंमत 350 रुपये प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 33,600/- रुपये, 4) 180 एम. एल. मापाचे रॉयल स्टॅग डिलक्स विस्की कंपनीच्या 02 सिलबंद खरड¬ाचे बॉक्समध्ये प्रति बॉक्स 48 विदेशी दारुच्या निपा असे एकुण 96 निपा विक्री किंमत 400 रुपये प्रमाणे अंदाजे एकुण किंमत 38,400/- रुपये, 5) देशी विदेशी दारु वाहतुक करीता वापरण्यात आलेली एक काळ्या तपकिरी रंगाची महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम. एच 46 ए. एल. 0027 जुनी अंदाजे किंमत 5,00,000/-रुपये, 6) एक ओप्पो कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल अंदाजे किंमत 6,000/- रुपये, 7) एक विवो कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल अंदाजे किंमत 6,000/- रुपये असा एकुण 09,86,000/- (अक्षरी नऊ लाख शहाएंशी हजार रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे चातगाव येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ), 83, 98 (2), म.दा.का. अन्वये आरोपी नामे 1) जिनेश मेश्राम रा. गोकुलनगर गडचिरोली ता. जि. गडचिरोल, 2) आकाश भरडकर रा. गोकूलनगर गडचिरोली ता. जि. गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्रातील फरार आरोपींचा शोध घेणे सुरु असून, गुन्ह्राचा पुढील तपास मपोउपनि. आश्विनी पाटील, पोस्टे चातगाव ह्रा करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनी श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि भगतसिंग दुलत, पोहवा सुधाकर दंडीकवार, पोना धनंजय चौधरी, चापोअ दिपक लोणारे यांनी पार पाडली.



