“सामाजिक कार्याच्या भक्कम पायाचा गौरव – सूरज गुंडमवार सन्मानित”
"समाजहितासाठी अविरत कार्य करणारे सूरज गुंडमवार यांना सन्मानपत्र प्रदान" गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्याचा गौरव

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक:- 24 ऑगस्ट 2025
गडचिरोली: माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या श्री. सूरज गुंडमवार जिल्हा उपाध्यक्ष यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या बैठकीत समितीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष मा. श्री. महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज उराडे यांच्या हस्ते श्री. सूरज गुंडमवार यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व मागास जिल्ह्यात अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि माहिती अधिकार या क्षेत्रांत कार्यरत राहून सामाजिक न्याय, गरिब-गरजूंना हक्क मिळवून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि लोकजागृती घडवून आणणे या क्षेत्रांत श्री.सूरज गुंडमवार यांनी सातत्याने केलेल्या कार्याची समितीने दखल घेतली. त्यांच्या कार्यात गुणवत्ता, प्रामाणिकपणा, संघटनात्मक कौशल्य, जनहिताशी बांधिलकी आणि निस्वार्थ सेवा भाव स्पष्ट दिसून येते.
समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देणे, शिक्षण व माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, तसेच गोरगरीबांसाठी न्याय आणि अधिकार मिळवून देण्यासाठी अहोरात्र लढणारे कार्यकर्ते म्हणून श्री. सूरज गुंडमवार हे आदर्श ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बैठकीत जिल्हा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सूरज गुंडमवार यांच्या सन्मानाबद्दल जिल्हाभरातून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.