गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक 8 मार्च 2026
गडचिरोली पोलीस दल पोलीस शिपाई भरती 2024-25 साठी दिनांक 14/02/2026 ते 07/03/2026 दरम्यान घेण्यात आलेल्या शारिरिक मैदानी चाचणी मध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणाची यादी उमेदवारांच्या माहीतीकरीता प्रत्येक दिवशी प्रकाशित करण्यात आलेली होती.
Bआज पावेतो शारिरिक मैदानी चाचणी घेण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना मिळालेल्या गुणांची एकत्रित यादी ही गडचिरोली पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ www.gadchirolipolice.gov.in येथे व पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथील बाहेरील फलकावर उमेदवारांच्या माहिती करीता प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदर पोलीस शिपाई भरती 2024-2025 करीता महाराष्ट्र शासन अधिसुधना गृह विभाग, दिनांक 23 जुन 2022 अन्वये शारीरिक चाचणीत किमान 50% गुण प्राप्त करणारे उमेदवार संबंधीत प्रवर्गामधील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त जागांच्या 1:10 या प्रमाणात लेखी चाचणी करीता पात्र झाले आहेत.
प्रसिध्द करण्यात आलेल्या उमेदवांराच्या यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी यादी प्रसिध्द झाल्याच्या वेळेपासुन 24 तासामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष येथे व्यक्तीगतरित्या हजर राहुन किंवा आवेदन अर्ज सादर करताना दिलेल्या ईमेल आयडी वरून पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमेल आयडी sp.gadchiroli@mahapolice.gov.insp.gadchiroli@mahapolice.gov.in यावर आक्षेप नोंदवू शकता. यादी प्रसिध्द झाल्याचे वेळेपासुन 24 तासानंतर प्राप्त होणारे कोणतेही आक्षेप स्विकारले जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आमिष किंवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दुरध्वनी क्रमांक 8806312100 यावर संपर्क साधावा.

