आष्टी जिल्हा प्रतिनिधी दिनांक:-09/03/2025
ईल्लुर येथील राजश्री शाहू महाराज अभ्यासिकेत जागतिक महीला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या प्रसंगी ईल्लुर येथील विकास चापले या पोलिस दलात कार्यरत युवकाने अभ्यासिकेला पाच हजारांची स्पर्धा परीक्षेची व इतर संदर्भ पुस्तके भेट देवून सामाजिक बांधिलकी जोपासली. ते सध्या मुरूमगाव येथील पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
इल्लूर येथील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे व इतर विदयार्थी नियमितपणे अभ्यास करीत असतात. गावातील या होतकरू विद्यार्थ्यांना विवीध पुस्तके भेट देण्याची परंपरा सुरु केल्याने याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी वेदा किरण बामणकर यांच्याकडून महापुरुषाचे फोटो फ्रेम भेट देण्यात आले कार्यक्रमांचे संचालन अक्षता लांबाडे प्रास्ताविक किरण बामनकर आभार निशा कपाट यांना मानले. याप्रसंगी सुषमा खोब्रागडे, कल्याणी वालदे, आरती भांडेकर, सुदेशना शेंडे ,अनुराधा मंडरे, पायल वाघाडे,साहिल चौधरी ,चेतन बोरकुटे, संकेत लांबाडे ,जगदीश कपाट , भारती दडमल ,गुंजन बामणकर आदींनी सहकार्य केले.