सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 11 मार्च 2025
जिल्हाधिकारी न्यायालयाने सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि काही सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४(१)(ह) अंतर्गत अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे संबंधित पदे तत्काळ रिक्त झाली आहेत.
ही याचिका साईकुमार पुल्लया मंदा (रा. टेकडातांडा, ता. सिरोंचा) यांनी दाखल केली होती. त्यांनी ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता. प्रतिवादींमध्ये गैरअर्जदार सरपंच श्रीमती निर्मला विभमम्या कुळमेथे, श्री.नियमामा येरेव्या कुळमेथे, सदस्य,श्रीमाती रोषक्का नारायण जाही, सदस्य, श्रीमती यशोदा किसमतराय महावी, सदस्य,कु. क्रिष्णर्वणी शंकर आलाम सदस्य, वरील सर्व रा. जाफ्राबाद ता. सिरोंचा नि. गडचिरोली यांच्या समावेश होता.
न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी घेतल्यानंतर, संबंधित सदस्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला आहे. तसेच, हा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (सिरोंचा) आणि जांभाळी ग्रामपंचायत सचिव यांना पाठवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे जाफ्राबाद ग्रामपंचायतीच्या स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणि नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
Four members including Sarpanch of Jaffrabad Gram Panchayat in Sironcha Taluka disqualified….