# अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात – VIDARBHANEWS 24
आपला जिल्हा

अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात

. स्थानिक गुन्हे शाखेने केला एकूण 1 कोटी 19 लाख 83 हजार रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत

गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:- 14/11/2025

गडचिरोली जिल्ह्रात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. या पाश्र्र्वभूमीवर गडचिरोली पोलीसांनी दिनांक 14/11/2025 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणा­या पोलीस मदत केंद्र, मालेवाडा हद्दीमध्ये मौजा हु­र्यालदंड येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 14/11/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजा हु­र्यालदंड येथे राहणारा इसम नामे कृष्णा हरसिंग बोगा याने त्याचे राहते घराच्या सांदवाडीत अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे. अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक मौजा हु­र्यालदंड येथे रवाना झाले. गोपनिय माहितीमध्ये नमूद संशयीत इसम नामे कृष्णा हरसिंग बोगा, वय 41 वर्षे, रा. हु­र्यालदंड, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या घराच्या सांदवाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घराच्या सांदवाडीत अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केलेली मिळून आली.

सदर ठिकाणी पंचासमक्ष तपासणी केली असता, घराच्या सांदवाडीत लागवड केलेला गर्द हिरव्या रंगाची पाने, फुले, बोंडे व बिया संलग्न असलेले कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ निव्वळ गांजा 239.66 कि.ग्रॅ वजन असलेला एकुण 1,19,83,000/- (अक्षरी – एक कोटी एकोणविस लाख त्र्याऐंशी हजार) रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळुन आला. आरोपी याने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या घराच्या सांदवाडीमध्ये सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने आरोपी नामे कृष्णा हरसिंग बोगा, वय 41 वर्षे, रा. हु­र्यालदंड, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याचे विरुध्द पोलीस स्टेशन, पुराडा येथे आज दिनांक 14/11/2025 रोजी अप. क्र. 111/2025, कलम 8 (सी), 20 (बी), 20 (बी) (त्त्) (सी) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोमकें मालेवाडाचे पोउपनि. आकाश नायकवाडी हे करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण फेगडे यांचे नेतृत्वात, सपोनी समाधान दौंड, पोअं/रोहीत गोंगले, पोअं/प्रशांत गरफडे, पोअं/शिवप्रसाद करमे, चापोअं/गणेश वाकडोतपवार, पोहवा/संतोष नादरगे, पोअं/नितेश सारवे यांनी पार पाडली.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

शेअर करा.

मुख्य संपादक

संदीप राचर्लावार, मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क

Related Articles

Back to top button
Don`t copy text!